Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 11 Oct 2017 11:55 AM (IST)
1/7
मात्र विराटचा कधीही शून्यावर बाद न होण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाने इथेच थांबवला.
2/7
यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानचा ऑलराऊंडर खेळाडू शोएब मलिकच्या नावावर होता. पदार्पणानंतर 40 टी-20 सामन्यात मलिक एकदाही शून्यावर बाद झाला नाही.
3/7
गेल्या 48 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कोहली पहिल्यांदाच शून्यावर बाद झाला. यापूर्वी सलग 47 इनिंगमध्ये कोहली कधीही शून्यावर बाद झाला नव्हता.
4/7
मात्र या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने अशी कामगिरी केली, ज्याची प्रेक्षकांना बिलकूलही अपेक्षा नव्हती. कोहली शून्यावर बाद होऊन माघारी परतला.
5/7
टीम इंडियाने दिलेलं 119 धावांचं लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 15.3 षटकांत पूर्ण केलं.
6/7
गुवाहाटी ट्वेंटी ट्वेंटीत ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाचा आठ विकेट्स राखून पराभव केला. टीम इंडियाने दिलेलं 119 धावांचं लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 15.3 षटकांत पूर्ण केलं. मॉइजेस हेनरिकेज आणि ट्रॅविस हेड हे कांगारूंच्या विजयाचे शिल्पकार ठरले. या दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी अभेद्य 109 धावांची भागिदारी केली
7/7
टीम इंडियाने 20 षटकांमध्ये सर्व विकेट्स गमावून 118 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या बेहरेनड्रॉफ, झम्पा यांच्या भेदक गोलंदाजीपुढे टीम इंडियातील मातब्बरांनी नांगी टाकली. सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या 8 धावांवर माघारी परतल्यानंतर कर्णधार कोहली भोपळाही न फोडता तंबूत परतला. त्यानंतर मनिष पांडे, शिखर धवनही एकेरी आकड्यांवर बाद झाले.