दमदार अभिनयाच्या बळावर गेल्या अनेक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या विनोद खन्ना यांनी वयाच्या 70 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
2/7
अभिनेते आणि दिग्गज थिएटर आर्टिस्ट टॉम अल्टर यांचं निधन यावर्षी 29 सप्टेंबर रोजी झालं. ते 67 वर्षांचे होते. त्वचेच्या कर्करोगाने ते त्रस्त होते.
3/7
गेल्या काही काळापासून शशी कपूर यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर मुंबईतील कोकीळाबेन रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर प्रदीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. शशी कपूर यांचा जन्म 1938 मध्ये झाला होता. शशी कपूर हे दिग्गज अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचे पुत्र, तर शोमॅन राज कपूर आणि अभिनेते शम्मी कपूर यांचे बंधू. शशी कपूर यांच्या पश्चात करण कपूर, कुणाल कपूर आणि संजना कपूर ही तीन मुलं आहेत.
4/7
ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांनी 18 मे 2017 रोजी अखेरचा श्वास घेतला. त्या 58 वर्षांच्या होत्या. 21 जून 1958 रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला होता.
5/7
दिग्गज अभिनेते ओम पुरी, ज्यांचा आवाज आजही प्रेक्षकांच्या कानात घुमतो.. 66 वर्षीय ओम पुरी यांचं निधन 6 जानेवारी 2017 रोजी झालं.
6/7
अभिनेता इंदर कुमारच्या अचानक जाण्याने चाहतेही हळहळले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने इंदर कुमारने वयाच्या 45 व्या वर्षा अखेरचा श्वास घेतला. 1996 साली त्याने मासूम या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 20 पेक्षा जास्त बॉलिवूड सिनेमांमध्ये त्याने काम केलेलं आहे.
7/7
बॉलिवूडचा चॉकलेट हिरो अशी ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं निधन झालं. वयाच्या 79 व्या वर्षी प्रदीर्घ आजारामुळे शशी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला. बॉलिवूडने यावर्षात असे काही कलाकार गमावले आहेत, ज्यांची जागा कधीही भरु शकणार नाही.