'जॉली एलएलबी' हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा आहे. या सिनेमात अभिनेता अरशद वारसी मुख्य भूमिकेत होता.
2/10
अक्षयने आतापर्यंत ऑन स्क्रीन आठवेळा आपलं नाव विजय ठेवलं आहे आणि सातवेळा राज. विशेष म्हणजे सातपैकी पाचवेळी राज मल्होत्रा हेच नाव होतं. खरंतर राज म्हटल्यावर शाहरुखच्या भूमिका आठवतात. मात्र, अक्षयलाही या नावाचं विशेष आकर्षण आहे.
3/10
अक्षय 'जॉली एलएलबी 2' या सिनेमाच्या सिक्वेलमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी अक्षय एका दिवसाची फीस एक कोटी रुपये प्रतिदिन घेणार आहे, असं वृत्त 'मुंबई मिरर' या वृत्तपत्राने दिलं आहे.
4/10
बंगळुरुमध्ये एकदा अक्षय कुमारची फ्लाईट सुटल्यानं तो पुन्हा फिल्म स्टुडिओमध्ये परतला आणि त्यावेळी प्रमोद चक्रवर्ती यांनी त्याला 'दीदार'ची ऑफर दिली आणि तिथेच अक्षयने पहिला सिनेमा साईन केला.
5/10
अक्षय कुमारला साधारणत: सकाळच्या वेळेस मुलाखत द्यायला आवडतं. त्याच्या बहुतेक मुलाखती सकाळीच असतात.
6/10
अक्षय कुमार आपल्या खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष देतो. फिटनेसकडे अत्यंत गांभीर्याने पाहणारा अक्षय संध्याकाळी जेवल्यानंतर रात्री काहीच खात नाही. शिवाय, तो रात्री लवकर झोपून सकाळू लवकर उठतो.
7/10
अक्षय कुमारच्या जिममध्ये खास वेगळे असे काही इक्विपमेंट्स नसतात. बॉक्सिंग आणि मार्शल आर्ट्सच्या माध्यमातून अक्षय स्वत:ला फिट ठेवतो.
8/10
अक्षयच्या आयुष्यातील एक मस्त किस्सा आहे. एकदा अक्षयला कळलं की, राजेश खन्ना आपल्या सिनेमासाठी तरुण कलाकाराच्या शोधात आहे. त्यावेळी अक्षयने राजेश खन्नांना भेटायला गेला आणि चार ते पाच तास वाट पाहिली. मात्र, अखरे राजेश खन्ना यांची भेट झालीच नाही आणि तो रिकाम्या हाती परतला. मात्र, अक्षयला स्वप्नातही वाटलं नव्हतं की, पुढे याच राजेश खन्ना यांचे आपण जावाई होणार आहोत.
9/10
अक्षय कुमार कराटेचा ब्लॅकबेल्ट चँपियन आहे.
10/10
अक्षयला आपल्या सिनेमात मेकओव्हर आवडत नाहीत. जर आपण 50 वर्षांचे आहोत, तर 50 वर्षीयच दिसायला हवं, असं त्याचं म्हणणं आहे.