एक्स्प्लोर
वर्ल्डकपमध्ये 5 डावखुरे गोलंदाज टीम इंडियाची डोकेदुखी वाढवणार
स्टार्कच नाहीतर इतरही डावखुरे गोलंदाज टीम इंडियाचे टेन्शन वाढवणार आहेत, यांचा सामना फलंदाज कसा करणार? विश्वचषकात टीम इंडियाची डोकेदुखी ठरणाऱ्या पाच डावखुऱ्या गोलंदाजाबाबत पाहुयात...
mitchell starc
1/6

विशाखापट्टनम वनडे सामन्यात स्टार्कने आघाडीची फळीला तंबूत पाठवले आहेत. भारतीय संघाविरोधात डावखुरे वेगवान गोलंदाज प्रभावी ठरत असल्यामुळे प्रत्येक संघ एकतरी डावखुरा गोलंदाज संघात ठेवतोय.. 50 षटकांच्या विश्वचषकात टीम इंडियाला या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. तीन ते चार वर्ष झाले तरी याची तोड अद्याप मिळालेली नाही. विश्वचषक अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपला आहे. अशात भारतीय टीम काय उपाय योजना करणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
2/6

ऑस्ट्रेलियाचा स्टार अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क जगातील सर्वात घातक डावखुऱ्या वेगवान गोलंदाजापैकी एक आहे. स्टार्कने नेहमीच टीम इंडियाला अडचणीत टाकलेय. आताच झालेल्या वनडे सामन्यातही स्टार्कने दिग्गज खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. स्टार्कच्या घातक गोलंदाजीपुढे टीम इंडियाला 120 धावाही करता आल्या नाहीत. अशातच आगामी विश्वचषकात टीम इंडियासाठी ही धोक्याची घंटा असेल. स्टार्कचा सामना भारतीय खेळाडू कसे करणार? याबाबत क्रीडा चाहते बुचकळ्यात आहेत.
Published at : 21 Mar 2023 09:07 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
बीड
महाराष्ट्र
राजकारण






















