एक्स्प्लोर
SRH vs RR : सनरायजर्स हैदराबाद की राजस्थान रॉयल्स, चेन्नईचं मैदान कोण गाजवणार? आयपीएल फायनलचं तिकीट कुणाला?
SRH vs RR : आयपीएलमध्ये आज क्वालिफायर 2 मध्ये सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मॅच होणार आहे. या मॅचमध्ये जिंकणारा संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल.

SRH vs RR
1/6

क्वालिफायर-1 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभव स्वीकारावा लागलेल्या सनरायजर्स हैदराबादची आज राजस्थान रॉयल्सशी लढत होणार आहेत. आजच्या मॅचमध्ये जो विजय मिळवेल तो फायनलमध्ये केकेआर विरुद्ध लढणार आहे.
2/6

सनरायजर्स हैदराबादनं राजस्थान रॉयल्सला एक रननं पराभूत केलं होतं. त्यानंतर राजस्थान रॉयल्सला सलग पराभवांना सामोरं जावं लागलं होतं. राजस्थाननं पराभवाची मालिका बंगळुरुला पराभूत करुन खंडीत केली.
3/6

राजस्थान रॉयल्स पुढं अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड या आक्रमक फलंदाजांना रोखण्याचं आव्हान असेल. हैदराबादला आक्रमक सुरुवात करुन देण्याचं काम या जोडीनं केलं आहे. मात्र, गेल्या दोन मॅचमध्ये ट्रेविस हेड शुन्यावर बाद झालाय.
4/6

राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसन ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा विरुद्ध ट्रेंट बोल्टला बॉलिंगला संधी देऊ शकतो. याशिवाय इकबाल चहल आणि आर. अश्विन हे दोघे देखील हैदराबाद विरुद्ध दमदार कामगिरी करु शकतो.
5/6

सनरायजर्स हैदराबादकडे ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा ही आक्रमक फलंदाजांची सलामीची जोडी आहे. याशिवाय हेनरिक क्लासेन, राहुल त्रिपाठी हे दमदार फलंदाजी करु शकतात. मात्र, हैदराबादला पाचव्या गोलंदाजाची अडचण निर्माण होत आहे. हैदराबाद चार गोलंदाजांसह खेळत आहे. शहाबाझ अहमद आणि नितीश रेड्डी पाचव्या बॉलरची भूमिका पार पाडतात.
6/6

सनरायजर्स हैदराबादनं यापूर्वी झालेल्या आयपीएलमध्ये झालेल्या दोन लढतीत राजस्थान रॉयल्सला पराभूत केलं आहे. राजस्थानची मदार यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, रियान पराग यांच्यावर असेल.
Published at : 24 May 2024 08:01 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
विश्व
क्राईम
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
