एक्स्प्लोर
MI vs GT IPL 2025: जसप्रीत बुमराह अन् महेला जयवर्धने भिडले; कायरन पोलार्डही बघत बसला, नेमकं काय घडलं?
MI vs GT IPL 2025: मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक महेला जयवर्धने आणि जसप्रीत बुमराह यांच्यात सामन्यादरम्यान वाद झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
MI vs GT IPL 2025
1/7

MI vs GT IPL 2025: आयपीएल 2025 च्या हंगामातील काल झालेल्या एलिमिनेटर लढतीत मुंबई इंडियन्सने थरारक विजय मिळवताना गुजरात टायटन्सचे कडवे आव्हान 20 धावांनी परतवले. (IPL 2025)
2/7

जसप्रीत बुमराह सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना महेला जयवर्धने त्याला काहीतरी सांगत होता. मात्र त्यावर बुमराह सहमत दिसत नव्हता. यावरुन दोघांत वाद झाल्याचे बोलले जात आहे. यादरम्यान कायरन पोलार्डही दोघांकडे पाहत बसला होता. (IPL 2025)
3/7

गुजरात टायटन्सच्या डावातील 13 व्या षटकात ही घटना घडली. मुंबईकडून ट्रेंट बोल्ट षटक टाकत होता. यावेळी जसप्रीत बुमराह सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता. (IPL 2025)
4/7

जसप्रीत बुमराह आणि महेला जयवर्धनेचे यादरम्यानचे फोटो आणि व्हिडीओही सध्या व्हायरल होत आहे. (IPL 2025)
5/7

जसप्रीत बुमराह आणि महेला जयवर्धने यांच्यात नेमका काय संवाद सुरु होता, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (IPL 2025)
6/7

मुंबईने प्रथम फलंदाजी करताना रोहित (50 चेंडूत 81 धावा) आणि बेअरस्टो (22 चेंडूत 47 धावा) यांच्या खेळीच्या जोरावर पाच विकेट्स गमावून 228 धावा केल्या. प्रत्युत्तरात, आयपीएलच्या या हंगामातील सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज साई सुदर्शनने 49 चेंडूत 80 धावा केल्या. मात्र त्यानंतरही गुजरातचा संघ सहा विकेट्स गमावून 208 धावाच करू शकला आणि स्पर्धेतून बाहेर पडला. (IPL 2025)
7/7

14व्या षटकात जसप्रीत बुमराहने सुंदरला त्रिफळाचीत केले. हा सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरला. पुढच्याच षटकात रिचर्ड ग्लीसनने सुदर्शनचा बहुमूल्य बळी मिळवत मुंबईला सामन्यावर घट्ट पकड मिळवून दिली. ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांनीही चांगली गोलंदाजी करत मुंबईच्या विजयात योगदान दिले.(IPL 2025)
Published at : 31 May 2025 08:13 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























