एक्स्प्लोर
KL Rahul : केएल राहुलनं आयपीएल गाजवलं, रिटर्न गिफ्ट मिळणार, 1021 दिवसानंतर टीम इंडियात कमबॅक होणार?
KL Rahul : केएल राहुलनं आयपीएलच्या 18 व्या हंगामात दमदार फलंदाची केली आहे. त्यानं एक शतक आणि तीन अर्धशतकं करत 493 धावा केल्या आहेत.
केएल राहुल
1/7

आयपीएलचा 18 वा हंगामानंतर भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडचा दौरा करणार आहे. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात भारताला बांगलादेशचा दौरा करायचा आहे. या दौऱ्यावर भारत तीन वडे आणि तीन टी 20 सामने खेळणार आहे.
2/7

एका मीडिया रिपोर्टनुसार आयपीएल 2025 मधील दमदार कामगिरीमुळं केएल राहुलला बांगलादेश विरुद्ध टी 20 संघात स्थान दिलं जाऊ शकतं. गेल्या दोन वर्षांपासून केएल राहुल केवळ वनडे आणि कसोटी सामने खेळत आहे.
3/7

टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार केएल राहुलला बांग्लादेश विरुद्ध टी 20 संघात स्थान मिळू शकतं. केएल राहुलनं नोव्हेंबर 2022 नंतर भारताकडून टी 20 सामना खेळलेला नाही. केएल राहुलनं आयपीएलच्या 18 व्या हंगामात दमदार फलंदाजी करत टीकाकारांना उत्तर दिलं आहे.
4/7

केएल राहुलनं आयपीएलच्या 18 व्या हंगामात 11 मॅचमध्ये 61.63 च्या सरासरीनं 493 धावा केल्या आहेत. त्यानं एक शतक आणि तीन अर्धशतकं केली आहेत.
5/7

केएल राहुलचं स्ट्राईक रेट 148 इतकं आहे.त्यामुळं निवड समितीकडून टी 20 संघातील निवडीसाठी केएल राहुलचा विचार केला जाऊ शकतो.
6/7

केएल राहुलनं शेवटची आंतरराष्ट्रीय टी 20 मॅच 2022 मध्ये खेळली होती. वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये त्यानं 5 धावा केल्या होत्या.
7/7

बांग्लादेश विरूद्धच्या मालिकेत त्याला संधी मिळाल्यास तो 1021 दिवसानंतर भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन करेल. केएल राहुलनं 72 मॅचमध्ये 2265 धावा केल्या आहेत. राहुलनं 2 शतकं आणि 22 अर्धशतकं केली आहेत.
Published at : 19 May 2025 10:33 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पर्सनल फायनान्स
मुंबई
राजकारण


















