एक्स्प्लोर
IPL 2024 : भारताच्या 'या' अनकॅप्ड युवा खेळाडूंनी मैदान गाजवलं, धमाकेदार कामगिरीच्या जोरावर टीमसाठी ठरले गेमचेंजर
IPL 2024 : यंदाचं आयपीएल आता अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. या आयपीएलमध्ये अनेक अनकॅप्ड युवा खेळाडूंनी मैदान गाजवलं. यामध्ये रियान पराग ते शशांक सिंह यांचा समावेश आहे.
भारताच्या अनकॅप्ड युवा खेळाडूंनी आयपीएल गाजवलं
1/5

पंजाब किंग्जला शशांक सिंह संघात घ्यायचं नव्हतं मात्र ऑक्शनवेळी झालेल्या गोंधळानंतर 20 लाखात संघात घेतलं होतं. शशांक सिंहच्या खेळीच्या जोरावर पंजाबनं अनेक सामने जिंकले.शशांक सिंहनं 13 मॅचमध्ये 2 अर्धशतकासह 352 धावा केल्या.
2/5

यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक आक्रमक सलामीची जोडी म्हणून सनरायजर्स हैदराबादच्या अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड चर्चेत आहेत. अभिषेक शर्मा हा भारताचा अनकॅप्ड खेळाडू आहे. त्यानं 201 च्या स्ट्राइक रेटनं 12 मॅचमध्ये 2 अर्धशतकांसह 201 धावा केल्या होत्या.सनरायजर्स हैदराबादनं 6.5 कोटी रुपये अभिषेक शर्माला संघात घेतलं होतं.
3/5

रियान पराग राजस्थान रॉयल्ससाठी रनमशीन ठरला आहे.त्यानं 13 मॅचमध्ये 531 धावा केल्या आहेत. रियान परागला 3.8 कोटी रुपयांना राजस्थाननं संघात घेतलं होतं
4/5

कोलकाता नाईट रायडर्सकडून हर्षित राणानं दमदार कामगिरी केली. हर्षित राणानं बॉलिंगच्या जोरावर लक्ष वेधलं. 10 मॅचमध्ये 16 विकेट घेतल्या आहेत. केकेआरनं 20 लाखांमध्ये त्याला संघात घेतलं होतं.
5/5

तुषार देशपांडेनं चेन्नई सुपर किंग्जकडून 17 व्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली. तुषार देशपांडेला सीएसकेनं 20 लाख रुपयांना संघात घेतलं होतं. तुषार देशपांडेनं 12 मॅचनंतर 16 विकेट घेतल्या आहेत.
Published at : 17 May 2024 08:46 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























