एक्स्प्लोर
IPL 2023 : मुंबई आणि बंगळुरुला टॉप 4 मध्ये जाण्याची संधी, आजच्या सामन्यात कोण मारणार बाजी?
IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ सध्या गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे, मुंबई संघ सहाव्या क्रमांकावर आहे. या दोन्ही संघांमधील जो संघ आज विजय मिळवेल त्या संघाला टॉप 4 मध्ये जाण्याची संधी आहे.
IPL 2023 Team Position | CSK vs MI | RCB vs DC
1/12

आयपीएल 2023 मध्ये मुंबई आणि बंगळुरु संघाला आगामी सामन्यात विजयी कामगिरी करत टॉप 4 मध्ये प्रवेश करण्याची संधी आहे.
2/12

आज मुंबईचा सामना चेन्नईसोबत आणि बंगळुरुचा सामना दिल्लीसोबत होणार आहे.
3/12

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ सध्या गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे, मुंबई संघ सहाव्या क्रमांकावर आहे.
4/12

या दोन्ही संघांमधील जो संघ आज विजय मिळवेल त्या संघाला टॉप 4 मध्ये जाण्याची संधी आहे.
5/12

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामना 6 मे रोजी चेन्नईतील चेपॉक स्टेडिअमवर रंगणार आहे. हा सामना दुपारी 3.30 वाजता खेळवला जाणार आहे.
6/12

आरसीबी (RCB) आणि दिल्ली (DC) यांच्यात आज, 6 मे रोजी सामना रंगणार आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. नाणेफेक संध्याकाळी 7.00 वाजता होईल.
7/12

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 29 सामने खेळवण्यात आले आहेत.
8/12

यामध्ये बंगळुरुचं पारड जड दिसून आलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 29 पैकी 18 सामने जिंकले आहेत. तर, दिल्ली कॅपिटल्स संघाला 10 सामने जिंकता आले आहेत. एक सामना ड्रॉ झाला.
9/12

इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आतापर्यंत 35 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये मुंबईचं पारडं जड दिसून आलं आहे.
10/12

35 सामन्यांपैकी मुंबई संघाने 20 सामने तर चेन्नई संघाने 15 सामने जिंकले आहेत. पण यंदाच्या मोसमात याआधी झालेल्या सामन्यात चेन्नईनं मुंबईचा दारुण पराभव केला आहे. त्यामुळे ही लढत अटीतटीची होणार असून याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
11/12

मुंबई संघाने सलग दोन सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवून संघ विजयाची हॅटट्रिक मारण्याचा प्रयत्न करेल. मुंबईने मागील सामन्यात पंजाबचा तर त्याआधीच्या सामन्यात राजस्थानचा पराभव केला आहे. तर दुसरीकडे चेन्नई संघ सलग दोन सामन्यात पराभवानंतर आजच्या सामन्यात उतरणार आहे. मुंबई विरुद्धचा सामना जिंकून चेन्नई संघ विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल.11
12/12

बंगळुरुनं मागील सामन्यात लखनौ संघाचा पराभव केला आहे. आता विजयी मार्गावर कायम राहण्यासाठी आरसीबी प्रयत्न करेल. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सने मागच्या सामन्यात गतविजेता चॅम्पियन गुजरात टायटन्सचा पराभव केला आहे.
Published at : 06 May 2023 02:55 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या
वर्धा

















