एक्स्प्लोर
CSK vs GT : अहमदाबादेत रविवारी पावसाची जोरदार बॅटिंग, आज आयपीएलच्या सामन्यावरही पावसाचं सावट
CSK vs GT, IPL 2023 Final : आयपीएल 2023 (IPL 2023) च्या अंतिम सामन्यात रविवारी पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली.

IPL 2023 Weather Update | CSK vs GT | Ahmedabad Rain
1/9

पावसामुळे चेन्नई विरुद्ध गुजरात अंतिम सामना रद्द करण्यात आला. आयपीएल 2023 चा अंतिम सामना आता सोमवारी रंगणार आहे.
2/9

आयपीएल 2023 चा अंतिम सामना आज, सोमवारी राखीव दिवशी खेळवला जाणार आहे. रविवारी पावसानं प्रेक्षकांची निराशा केली.
3/9

आज 29 मे रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यावरही पावसाचं सावट आहे.
4/9

आयपीएल 2023 चा अंतिम सामना सोमवारी, 29 मे रोजी राखीव दिवशीही होऊ शकला नाही, तर गुजरात टायटन्स संघाला याचा फायदा होईल.
5/9

सोमवारीही महाअंतिम सामना पावसामुळे रद्द झाल्यास साखळी सामन्यानंतर आयपीएल गुणतालिकेतील (IPL 2023 Points Table) पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या संघाला महाविजेता म्हणून घोषित केलं जाईल.
6/9

आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये सध्या गुजरात टायटन्स संघ अव्वल आहे. त्यामुळे सोमवारी अंतिम सामना न झाल्यास चेन्नई सुपर किंग्स संघाला याचं नुकसान सहन करावं लागेल. यामुळे गुजरात टायटन्स आयपीएल 2023 चा विजेता ठरेल, कारण चेन्नई पॉईंट्स टेबलवर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
7/9

हवामान विभागाच्या माहितीनुसार, सोमवारीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. accuweather संकेतस्थळानुसार, अहमदाबादमध्ये सोमवारी ढगाळ वातावरण राहणार आहे.
8/9

संध्याकाळी सहा ते दहाच्या दरम्यान अहमदाबादमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे.
9/9

संकेतस्थळानुसार, संध्याकाळी सात ते दहा वाजता पावसाची शक्यता आठ टक्के वर्तवण्यात आली आहे.
Published at : 29 May 2023 12:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
राजकारण
बातम्या
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
