एक्स्प्लोर
IND Vs NZ WTC Final: न्यूझीलंडचे 'हे' पाच खेळाडू टीम इंडियासाठी ठरु शकतात डोकेदुखी
New Zealand Top 5
1/6

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 जून रोजी खेळला जाणार आहे. इंग्लंडमधील अंतिम सामना खेळला जाणार असल्यामुळे न्यूझीलंडचं पारडं जड आहे. त्याशिवाय नुकत्याच झालेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत यजमान इंग्लंडला 1-0 ने नमवून न्यूझीलंडने हे सिद्ध केले की ते नशिबाने नव्हे तर त्यांच्या कामगिरीमुळे अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी झाले आहेत. अंतिम सामना प्रामुख्याने भारतीय फलंदाज आणि न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांमधील स्पर्धा म्हणून पाहिले जात आहे. तर त्या खेळाडूंबद्दल बोलू जे अंतिम सामन्यात भारतासाठी सर्वात मोठी समस्या ठरू शकतात.
2/6

काईल जॅमिसन गेल्या वर्षी आयसीसी वर्ल्ड चॅम्यियनशिफ स्पर्धेदरम्यान काइल जॅमिसनने भारताविरुद्ध पदार्पण केले. जेमीसन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल्समधील सर्वात मोठं सरप्राईज पॅकेज मानलं जात आहे. आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये जॅमिसन उत्कृष्ट कामगिरी केली आहे. जॅमिसनने आतापर्यंत 7 कसोटी सामन्यांमध्ये सुमारे 15 च्या सरासरीने 39 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये एका डावात चार वेळा पाच विकेट आणि एका सामन्यात 10 विकेट घेण्याचा समावेश आहे. जर सात सामन्यांचा विचार केला तर जॅमिसनची गोलंदाजीची सरासरी गेल्या 100 वर्षांच्या इतिहासातील सर्वोत्तम तीन गोलंदाजांपैकी एक आहे.
Published at : 17 Jun 2021 05:33 PM (IST)
आणखी पाहा























