एक्स्प्लोर
T20 World Cup 2024 SA vs AFG: 'खरं खरं सांगू का, आम्ही...'; राशिद खान भावूक, पराभवामागील सांगितलं कारण, नेमकं काय म्हणाला?
T20 World Cup 2024 SA vs AFG: अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान भावूक झाला आणि त्याने या पराभवाचे कारणही सांगितले.
![T20 World Cup 2024 SA vs AFG: अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान भावूक झाला आणि त्याने या पराभवाचे कारणही सांगितले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/0d3da0d375fd501724b2772bd145e8831719469897237987_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
T20 World Cup 2024 Afghanistan
1/7
![T20 World Cup 2024 SA vs AFG: दक्षिण आफ्रिकेने टी-20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा 9 विकेट्स राखून पराभव केला. अफगाणिस्तानचा डाव 11.5 षटकात 56 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने केवळ 1 गडी गमावून लक्ष्य गाठले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/e2e666b6c79bc4a01a9a69b75db421a8739de.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
T20 World Cup 2024 SA vs AFG: दक्षिण आफ्रिकेने टी-20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा 9 विकेट्स राखून पराभव केला. अफगाणिस्तानचा डाव 11.5 षटकात 56 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने केवळ 1 गडी गमावून लक्ष्य गाठले.
2/7
![दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली आहे. दक्षिण अफ्रिकेवर आतापर्यंत चोकर्सचा टॅग होता, तो त्यांनी पुसुन काढला आहे. तसेच तब्बल 32 वर्षांनंतर दक्षिण अफ्रिकेचा संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/32f922e8036310eac263e0829e5c2941653a1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली आहे. दक्षिण अफ्रिकेवर आतापर्यंत चोकर्सचा टॅग होता, तो त्यांनी पुसुन काढला आहे. तसेच तब्बल 32 वर्षांनंतर दक्षिण अफ्रिकेचा संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे.
3/7
![उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी मारक कामगिरी केली. त्रिनिदादमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात आफ्रिकन गोलंदाजांनी अफगाणिस्तानला 56 धावांवर ऑलआउट केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/6bbb5ce36b4ef017a29efe6d939ac98c5d468.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी मारक कामगिरी केली. त्रिनिदादमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात आफ्रिकन गोलंदाजांनी अफगाणिस्तानला 56 धावांवर ऑलआउट केले.
4/7
![अफगाणिस्तानच्या एका फलंदाजाने दुहेरी आकडा गाठला. अजमतुल्ला 10 धावा करून बाद झाला. सलामीवीर गुरबाजला खातेही उघडता आले नाही. इब्राहिम झद्रान 2 धावा करून बाद झाला. या सामन्यात अफगाणिस्तानची फलंदाजी खराब झाली. अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान भावूक झाला आणि त्याने या पराभवाचे कारणही सांगितले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/a349f9fdd9df76cbe1b58247243862d26a7c6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अफगाणिस्तानच्या एका फलंदाजाने दुहेरी आकडा गाठला. अजमतुल्ला 10 धावा करून बाद झाला. सलामीवीर गुरबाजला खातेही उघडता आले नाही. इब्राहिम झद्रान 2 धावा करून बाद झाला. या सामन्यात अफगाणिस्तानची फलंदाजी खराब झाली. अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान भावूक झाला आणि त्याने या पराभवाचे कारणही सांगितले.
5/7
![अफगाणिस्तान संघाचा कर्णधार राशिद खान म्हणाला की, संघ म्हणून हा सामना त्यांच्यासाठी कठीण होता. त्याने कबूल केले की त्याच्या संघाला फलंदाजीत अधिक चांगली कामगिरी करता आली असती, परंतु परिस्थिती सोपी नव्हती. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीचेही कौतुक केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/82369deb9e5c0ff346657482cacdd3182239b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अफगाणिस्तान संघाचा कर्णधार राशिद खान म्हणाला की, संघ म्हणून हा सामना त्यांच्यासाठी कठीण होता. त्याने कबूल केले की त्याच्या संघाला फलंदाजीत अधिक चांगली कामगिरी करता आली असती, परंतु परिस्थिती सोपी नव्हती. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीचेही कौतुक केले.
6/7
![सामन्यानंतरच्या सादरीकरणात अफगाण संघाचा कर्णधार राशिद खान म्हणाला, हा सामना आमच्यासाठी कठीण होता. एक संघ म्हणून आम्ही नक्कीच चांगली कामगिरी करू शकलो असतो. खरं खरं सांगू का, आम्ही फलंदाजीत अपयशी ठरलो. होय, आम्ही कोणत्याही संघाला हरवू शकतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/87b1c0e8d9c54ae2ea90d0e870b9113c0e5ad.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सामन्यानंतरच्या सादरीकरणात अफगाण संघाचा कर्णधार राशिद खान म्हणाला, हा सामना आमच्यासाठी कठीण होता. एक संघ म्हणून आम्ही नक्कीच चांगली कामगिरी करू शकलो असतो. खरं खरं सांगू का, आम्ही फलंदाजीत अपयशी ठरलो. होय, आम्ही कोणत्याही संघाला हरवू शकतो.
7/7
![फलंदाजीत चांगली कामगिरी करावी लागेल. आमच्यासाठी हा एक उत्कृष्ट विश्वचषक ठरला आहे आणि मला अभिमान आहे की संघाने चमकदार कामगिरी केली आणि काही मोठ्या संघांना पराभूत करून चांगले निकाल मिळविले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/c7953eb54a11ca4b4090b54b6ab6d8b5fd4c3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फलंदाजीत चांगली कामगिरी करावी लागेल. आमच्यासाठी हा एक उत्कृष्ट विश्वचषक ठरला आहे आणि मला अभिमान आहे की संघाने चमकदार कामगिरी केली आणि काही मोठ्या संघांना पराभूत करून चांगले निकाल मिळविले.
Published at : 27 Jun 2024 12:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
अहमदनगर
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)