एक्स्प्लोर
T20 World Cup 2024: जसप्रीत बुमराह ते शेन वॉटसनपर्यंत...; 4 दिग्गज क्रिकेटपटूंनी स्पोर्ट्स प्रेझेंटरसोबत केलं लग्न
T20 World Cup 2024: सध्या टी-20 विश्वचषकाची स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत अनेक महिला स्पोर्ट्स प्रेझेंटर दिसून येत आहेत.
t20 world cup 2024
1/7

सध्या टी-20 विश्वचषकाची स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत अनेक महिला स्पोर्ट्स प्रेझेंटर दिसून येत आहेत. यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन हिचा देखील समावेश आहे. मात्र तुम्हाला माहितीय का?, आणखी तीन क्रिकेट आहेत, ज्यांनी स्पोर्ट्स प्रेझेंटरसोबत लग्नाची गाठ बांधली.
2/7

जसप्रीत बुमराह- जसप्रीत बुमराहच्या पत्नीचं नाव संजना गणेशन आहे. बुमराह आणि संजनाने 15 मार्च 2021 रोजी लग्न केले.
3/7

लग्नाआधी बुमराह आणि संजना एकमेकांना घमंडी असल्यासारखं समजत होते. मात्र एका मुलाखतीनंतर हा गैरसमज दूर झाला आणि हळूहळू दोघांना एकमेकांवर प्रेम झाले.
4/7

स्टुअर्ट बिन्नी- भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नीच्या पत्नीचं नाव मयांती लँगर आहे. मयांती एक प्रसिद्ध स्पोर्ट्स प्रेझेंटर आहे.
5/7

स्टुअर्ट बिन्नी आणि मयांती लँगरने 2012 रोजी लग्न केले. स्टुअर्ट बिन्नी आणि मयांती लँगरची पहिली मुलाखत 2008 साली झाली होती.
6/7

शेन वॉटसन- ऑस्ट्रिलिया संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनने देखील स्पोर्ट्स प्रेझेंटरसोबत लग्न केले. वॉटसनच्या पत्नीचं नाव फर्लांग आहे. फर्लांग ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध स्पोर्ट्स प्रेझेंटर आहे.
7/7

मार्टीन गप्टिल- न्यूझीलंड संघाचा दिग्गज फलंदाज मार्टीन गप्टिलने देखील स्पोर्ट्स प्रेझेंटर महिलेसोबत लग्न केले. गप्टिलच्या पत्नीचं नाव लॉरा मॅकगोल्ड्रिक आहे. दोघांनी 2014 रोजी लग्न केले.
Published at : 23 Jun 2024 07:20 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
हिंगोली
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
























