एक्स्प्लोर
भारताच्या पराभवास जबाबदार कोण? जाणून घ्या कारणं
IND vs BAN 1st ODI: विजय दृष्टीक्षेपात होता, तरिही भारताला पराभवाचा सामना करावा लागला. कोणत्या गोष्टीमुळे टीम इंडियाचा पराभव झाला
IND vs BAN
1/7

पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशनं भारताचा एक विकेट आणि चार षटकं राखून पराभव केला. केएल राहुलच्या अर्धशतकाच्या बळावर भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करताना फक्त 186 धावा केल्या. राहुलचा अपवाद वगळता भारतीय फलंदाजांना लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. बांगलादेशकडून शाकिब अल हसन याने पाच विकेट्स घेतल्या. भारताने दिलेले 187 धावांचे आव्हान पार करताना बांगलादेशची अवस्था बिकट झाली होती. पण मेंहदी हसन आणि मुस्तफिजूर यांनी दहाव्या विकेट्ससाठी अर्धशतकी भागिदारी करत बांगलादेशला विजय मिळवून दिला. विजय दृष्टीक्षेपात होता, तरिही भारताला पराभवाचा सामना करावा लागला
2/7

भारताच्या खेळाडूंनी पहिल्या एकदिवसीय सामन्यात अतिशय खराब क्षेत्ररक्षण केलेय. विकेटकिपर केएल राहुलनं सर्वाधिक निराश केले. राहुलनं मेंहदी हसन मिराज याचा अतिशय सोपा झेल सोडला, ही बांगलादेशची अखेरची जोडी होती. पण राहुलनं जिवनदान देत बांगलादेशला विजयाची संधी दिली. त्याशिवाय वॉशिंगटन सुंदर यानेही एक झेल सोडला. त्याशिवाय सीमारेषावर खराब क्षेत्ररक्षण झाल्यामुळे विनाकारण चौकार गेले. एका धावेच्या ठिकाणी दोन धावा दिल्या... कमी धावसंख्या असताना भारतीय खेळाडूंनी गचाळ क्षेत्ररक्षण केलं. हे भारताच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरलं..
Published at : 04 Dec 2022 10:53 PM (IST)
Tags :
IND Vs BANआणखी पाहा























