एक्स्प्लोर
IND vs AUS: टीम इंडियाचे योद्धे, हातात बॅट नाही, जणू तलवार घेऊनच मैदानात येतात, गोलंदाजांवर तुटून पडतात
विश्वचषकाच्या निर्णायक लढाईसाठी आज अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम सज्ज झालंय. इंग्लंड-न्यूझीलंड संघांमधल्या सलामीच्या लढाईनं विश्वचषकाच्या मोहिमेला 5 ऑक्टोबर रोजी याच स्टेडियममधून सुरुवात झाली होती.
IND vs AUS
1/7

IND vs AUS World Cup 2023 Final: विश्वचषकाच्या महायुद्धातल्या निर्णायक लढाईसाठी आज अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम सज्ज झालंय. इंग्लंड आणि न्यूझीलंड संघांमधल्या सलामीच्या लढाईनं विश्वचषकाच्या मोहिमेला पाच ऑक्टोबर रोजी याच स्टेडियममधून सुरुवात झाली होती. आणि आता विश्वचषक मोहिमेच्या सांगतेला भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या फौजा अहमदाबादच्या रणांगणात आमनेसामने उभ्या ठाकल्या आहेत. वन डे क्रिकेटच्या इतिहासात भारतानं आजवर 1983 आणि 2011 साली विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे. तसंच ऑस्ट्रेलियानं 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 साली विश्वचषकाचा मान मिळवला आहे.
2/7

विश्वचषक 2023 मध्ये रोहित शर्मानं एकही गोलंदाजाला अभय दिलं नाही. जो मला बॉल टाकणार त्याला मी झोडणार, अशाच आवेशात रोहित शर्मा मैदानात उतरतो आणि भल्याभल्या गोलंदाजांना फटकावतो. रोहित शर्मानं 10 डावांत 550 धावांची धमाकेदार खेळी 101.57 च्या सरासरीनं खेळली आहे.
Published at : 19 Nov 2023 01:51 PM (IST)
आणखी पाहा























