एक्स्प्लोर
पहिला दिवस ऑस्ट्रेलियाचा, उस्मान ख्वाजाची शतकी खेळी
पहिला दिवस ऑस्ट्रेलियाने गाजवला... उस्मान ख्वाजा याने शतक खेळी केली.
ind vs aus
1/10

India vs Australia 4th Test: इंडिया आणि ऑस्ट्रेलिया संघांमधील चौथा कसोटी सामना आजपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरु झाला असून पहिल्या दिवशी कागांरुंनी दमदार फलंदाजी केली आहे.
2/10

पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कागांरुंनी 255 धावा करत केवळ 4 विकेट्सच गमावले आहेत.
3/10

उस्मान ख्वाजा शतक ठोकून फलंदाजी करत असून कॅमरुन ग्रीनही चांगल्या लयीत आहे. तर भारताकडून जाडेजा आणि अश्विन प्रत्येकी 1 तर शमीने दोन विकेट्स घेतल्या आहेत.
4/10

टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा ऑस्ट्रेलियानं निर्णय घेतला. विशेष म्हणजे त्यांनी या निर्णायप्रमाणे दमदार फलंदाजी देखील केली त्यामुळे पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाची स्थिती 255 धावांवर चार गडी बाद अशी आहे.
5/10

ट्रेव्हीस हेड आणि उस्मान ख्वाजाने चांगली सुरुवात संघाला करुन दिली. 32 धावा करुन हेड बाद झाला. मग लाबुशेनही 3 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर कर्णधार स्मिथनं ख्वाजासोबत चांगली भागिदारी केली पण 38 धावा करुन स्मिथही बाद झाला.
6/10

हँड्सकॉम्बही 17 धावांवर तंबूत परतल्यावर कॅमरुन ग्रीननं दिवसअखेर फटकेबाजी करत 64 चेंडूत नाबाद 49 धावा केल्या आहेत. तर ख्वाजा 251 चेंडूत नाबाद 104 धावांवर खेळत आहे.
7/10

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 105 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 32 सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने 44 सामने जिंकले आहेत.
8/10

आजची कसोटी जिंकून भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित करेल.
9/10

टीम इंडिया 60.29 च्या विजयाच्या टक्केवारीसह जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.
10/10

ऑस्ट्रेलिया 68.52 विजयाच्या टक्केवारीसह पहिल्या क्रमांकावर असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (WTC Final) पोहोचली आहे.
Published at : 09 Mar 2023 07:44 PM (IST)
Tags :
IND Vs AUSआणखी पाहा
Advertisement
Advertisement























