एक्स्प्लोर

IIT Mumbai : आयआयटी मुंबई की आयआयटी बॉम्बे? भाजप मंत्र्याच्या वक्तव्यानंतर वाद वाढणार अन् राजकारण तापणार

IIT Mumbai Vs IIT Bombay : केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या ताज्या वादानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेत मुंबई आयआयटीच्या गेटसमोर 'आयआयटी बॉम्बे नाही आयआयटी मुंबई' असे बॅनर लावले.

मुंबई : आयआयटी मुंबई की आयआयटी बॉम्बे? हा प्रश्न यासाठी विचारला जातोय कारण याच मुंबई आणि बॉम्बेचा वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. याचं कारण म्हणजे दोन दिवसांपूर्वी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह (Jitendra Singh) यांनी मुंबई आयआयटीच्या कार्यक्रमात केलेले एक वक्तव्य. "आयआयटी बॉम्बेचे नाव आयआयटी मुंबई केले नाही यासाठी देवाचे आभार मानतो" असं ते म्हणाले. या वक्तव्याने पुन्हा एकदा बॉम्बे विरुद्ध मुंबई असा वाद चांगलाच पेटल्याचं दिसतंय. या सगळ्याचा समाचार मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सुद्धा घेतला आहे.

मुंबई विरुद्ध बॉम्बे... मुंबईला बॉम्बे म्हणून संबोधणाऱ्याचा विरोध या आधी आक्रमकपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. 2009 साली प्रदर्शित झालेल्या "वेक अप सीड" या चित्रपटात मुंबई ऐवजी बॉम्बे शब्द अनेकदा उच्चारला गेला. यावर मनसेने आक्षेप घेत कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यानंतर या प्रकरणात करण जोहरला माफी मागावी लागली.

या प्रकरणानंतर अनेकदा बॉम्बे विरुद्ध मुंबई असा वाद पाहायला मिळाला तेव्हा मनसेने प्रखरपणे भूमिका मांडली. आता केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या ताज्या वक्तव्यानंतर हा वाद पुन्हा एकदा वाढलाय.

Jitendra Singh On IIT Mumbai : नेमकं काय म्हणाले जितेंद्र सिंह?

राष्ट्रीय क्वांटम मोहिमेअंतर्गत फॅब्रिकेशन अँड सेंट्रल फॅसिलिटी उद्घाटन करण्यासाठी जितेंद्र सिंह मुंबई आयआयटीमध्ये आले होते. या कार्यक्रमात त्यांनी भाषण केलं. 'आपण देवाचे आभार मानतो की आयआयटी बॉम्बेचे नाव आयआयटी मुंबई केले नाही. म्हणजे ज्या प्रकारे आयआयटी मद्रास हे नाव तसेच राहिले, तसेच आयआयटी बॉम्बे चे सुद्धा राहीले' असं जितेंद्र सिंह म्हणाले.

Raj Thackeray On IIT Mumbai : राज ठाकरेंचे प्रत्युत्तर

या वक्तव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करत या सगळ्याचा समाचार घेतला. सरकारला मुंबई हे नाव खटकतंय... मुंबई ऐवजी बॉम्बे नाव त्यांना करायच आहे. मुंबई आणि हळूहळू एमएमआर गुजरातला जोडायचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे मराठी माणसांना हे कळायला हवं असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.

आयआयटी बॉम्बे हे संसदेच्या कायद्याने स्थापित केलेल्या आयआयटींपैकी एक आहे. शिवाय विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत आयआयटी मुंबईचे करार आहेत. त्यामुळे नावात बदल करायचा झाल्यास कायद्यात सुधारणा करावी लागेल अशी माहिती या संदर्भात मिळाली आहे.

IIT Mumbai Vs IIT Bombay : मुंबईतील राजकारण तापलं

केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं आणि बॉम्बे विरुद्ध मुंबई हा वाद वाढला. मनसेकडून रात्री मुंबई आयआयटीच्या गेटसमोर आयआयटी बॉम्बे नाही आयआयटी मुंबई असे बॅनर लावण्यात आले. यावर भाजपच्या नेत्यांनी सुद्धा राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.

आयआयटी बॉम्बेच नाव लगेच तातडीने आयआयटी मुंबई करून बदलणे जरी शक्य नसलं तरी मुंबई आणि बॉम्बे संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर ही मागणी आता जोर धरू लागली आहे. त्यामुळे मुंबई आणि बॉम्बेच्या या वादामध्ये मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणसुद्धा तापलेलं पाहायला मिळतंय.

ही बातमी वाचा:

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aravali hills: हिमालयापेक्षा जुन्या पर्वतरांगा अजब निर्णयामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर, दिल्लीची ढाल नष्ट होणार; राजस्थानमध्ये प्रचंड मोठं जनआंदोलन, सोशल मीडियातही आक्रोशाचा वणवा
हिमालयापेक्षा जुन्या पर्वतरांगा अजब निर्णयामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर, दिल्लीची ढाल नष्ट होणार; राजस्थानमध्ये प्रचंड मोठं जनआंदोलन, सोशल मीडियातही आक्रोशाचा वणवा
Epstein File: आलिशान आयलँड, 5 स्टार बेडरुम, तरुणींच्या छातीवर, मांडीवर मेसेज अन् रशियन मुलींचे रेटकार्ड सुद्धा! एपस्टीन फाईलमधील 15 धडकी भरवणारे फोटो
आलिशान आयलँड, 5 स्टार बेडरुम, तरुणींच्या छातीवर, मांडीवर मेसेज अन् रशियन मुलींचे रेटकार्ड सुद्धा! एपस्टीन फाईलमधील 15 धडकी भरवणारे फोटो
लॅम्बोर्गिनी-मर्सिडीजसह तब्बल 10 कोटींच्या आलिशान कार जप्त; युट्यूबरनं थेट दुबईत क्रुजवर लग्नाचा बार उडवताच ईडीच्या टप्प्यात! एकेकाळी सायकलने फिरणारा नेमका आहे तरी कोण?
लॅम्बोर्गिनी-मर्सिडीजसह तब्बल 10 कोटींच्या आलिशान कार जप्त; युट्यूबरनं थेट दुबईत क्रुजवर लग्नाचा बार उडवताच ईडीच्या टप्प्यात! एकेकाळी सायकलने फिरणारा नेमका आहे तरी कोण?
BMC Election: मुंबईत भाजपकडून दगाफटका झाल्यास स्वतंत्र लढण्याची चाचपणी, एकनाथ शिंदेंवर शिवसैनिकांचा दबाव
मोठी बातमी : मुंबईत भाजपकडून दगाफटका झाल्यास स्वतंत्र लढण्याची चाचपणी, एकनाथ शिंदेंवर शिवसैनिकांचा दबाव
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Kolhapur Hupari Murder : कोल्हापुरात हुपरीमध्ये पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या
Manikrao Kokate Resignation : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aravali hills: हिमालयापेक्षा जुन्या पर्वतरांगा अजब निर्णयामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर, दिल्लीची ढाल नष्ट होणार; राजस्थानमध्ये प्रचंड मोठं जनआंदोलन, सोशल मीडियातही आक्रोशाचा वणवा
हिमालयापेक्षा जुन्या पर्वतरांगा अजब निर्णयामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर, दिल्लीची ढाल नष्ट होणार; राजस्थानमध्ये प्रचंड मोठं जनआंदोलन, सोशल मीडियातही आक्रोशाचा वणवा
Epstein File: आलिशान आयलँड, 5 स्टार बेडरुम, तरुणींच्या छातीवर, मांडीवर मेसेज अन् रशियन मुलींचे रेटकार्ड सुद्धा! एपस्टीन फाईलमधील 15 धडकी भरवणारे फोटो
आलिशान आयलँड, 5 स्टार बेडरुम, तरुणींच्या छातीवर, मांडीवर मेसेज अन् रशियन मुलींचे रेटकार्ड सुद्धा! एपस्टीन फाईलमधील 15 धडकी भरवणारे फोटो
लॅम्बोर्गिनी-मर्सिडीजसह तब्बल 10 कोटींच्या आलिशान कार जप्त; युट्यूबरनं थेट दुबईत क्रुजवर लग्नाचा बार उडवताच ईडीच्या टप्प्यात! एकेकाळी सायकलने फिरणारा नेमका आहे तरी कोण?
लॅम्बोर्गिनी-मर्सिडीजसह तब्बल 10 कोटींच्या आलिशान कार जप्त; युट्यूबरनं थेट दुबईत क्रुजवर लग्नाचा बार उडवताच ईडीच्या टप्प्यात! एकेकाळी सायकलने फिरणारा नेमका आहे तरी कोण?
BMC Election: मुंबईत भाजपकडून दगाफटका झाल्यास स्वतंत्र लढण्याची चाचपणी, एकनाथ शिंदेंवर शिवसैनिकांचा दबाव
मोठी बातमी : मुंबईत भाजपकडून दगाफटका झाल्यास स्वतंत्र लढण्याची चाचपणी, एकनाथ शिंदेंवर शिवसैनिकांचा दबाव
Nandurbar News: सातपुड्यात कडाक्याच्या थंडीनं हाडं गोठायची वेळ; भाताच्या पेंढ्यावर जमली बर्फाची चादर
सातपुड्यात कडाक्याच्या थंडीनं हाडं गोठायची वेळ; भाताच्या पेंढ्यावर जमली बर्फाची चादर
Nashik Crime: निवडणुकीच्या धामधुमीत नाशिकमध्ये खळबळजनक घटना, माजी जिल्हा परिषद सदस्याचा नाल्यात आढळला मृतदेह, अपघाती मृत्यू की घातपात?
निवडणुकीच्या धामधुमीत नाशिकमध्ये खळबळजनक घटना, माजी जिल्हा परिषद सदस्याचा नाल्यात आढळला मृतदेह, अपघाती मृत्यू की घातपात?
Kolhapur Crime: आईच्या हाताची नस कापून चेहऱ्यावर वार, बापाच्या डोक्यात काठीने प्रहार; कोल्हापुरात पोटच्या दिवट्याने जन्मदात्यांना संपवलं
आईच्या हाताची नस कापून चेहऱ्यावर वार, बापाच्या डोक्यात काठीने प्रहार; कोल्हापुरात पोटच्या दिवट्याने जन्मदात्यांना संपवलं
Osman Hadi Death: उस्मान हादीच्या हत्येनंतर बांगलादेश पुन्हा पेटला; तो नेमका होता तरी कोण? शेजारच्या देशात नेमकं काय चाललंय??
उस्मान हादीच्या हत्येनंतर बांगलादेश पुन्हा पेटला; तो नेमका होता तरी कोण? शेजारच्या देशात नेमकं काय चाललंय??
Embed widget