ही बुरशी एक विशेष प्रकारचे बुरशीचे (फंगी) आहे. दोडामार्गमधील तिलारीच्या खोऱ्यात सापडलेली बुरशी ही केवळ पावसाळ्यातच दिसते किंवा प्रकाशमान होते. बुरशीची जंगलात वाढ होण्यासाठी पुरेसा ओलावा लागतो. ही प्रकाशमान होणारी बुरशी सहसा दिसत नाही त्यांना शोधायला फार कठीण असते त्यासाठी रात्री जंगलात फिरायला लागतं.
2/8
हे वन्यजीव अभ्यासक रात्री फिरण्यासाठी तिलारीच्या जंगलात गेले असता त्यांच्याजवळील लाईट बंद करुन उभं राहिले. काही वेळाने जंगलात काहीतरी प्रकाशमान होत आहे हे समजल्यावर त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या मोबाईलमध्ये फोटो, व्हिडीओ टिपण्याचा प्रयत्न केला. मात्र मोबाईलमध्ये फोटो, व्हिडीओ आले नाहीत. जेव्हा त्यांनी ही चमकणारी बुरशी पहिल्यांदा पाहिली त्यावेळी ते स्तब्ध झाले.
3/8
वन्यजीव अभ्यासकांच्या मते ही बुरशी रात्री प्रकाशमान होते त्यातून प्रकाशाचे उत्सर्जन करते. ही प्रकाशमान होणारी बुरशी झाडाची साल, जुन्या सडलेल्या झाडांच्या खोडावर, जंगलातील वनस्पतीच्या पानांवर ज्या ठिकाणी ओलावा असतो अशा ठिकाणी प्रकाशमान होते.
4/8
दिवसा ही प्रकाशमान होणारी बुरशी सामान्य बुरशीप्रमाणे दिसते परंतु रात्रीच्या वेळी त्यातून प्रकाश बाहेर पडतो.
5/8
तिलारीच्या जंगलातल्या झाडांची खोड आणि झाडांची पान चमकत अंधारात चमकतात किंवा प्रकाशमान होतात. त्यांच्यामधून हिरवा प्रकाश येत बाहेर येत होता.
6/8
तळकोकणातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी भागातील वन्यजीव अभ्यासक संजय सावंत, अमित सुतार, तुषार देसाई, संजय नाटेकर, देवेंद्र शेटकर, राजन कविटकर, विकास देसाई, विनायक देसाई रात्रीच्या वेळी जंगलात फिरत असतात. तिथे तिलारीच्या घनदाट जंगलात ही बुरशी दिसली.
7/8
ही प्रकाशमय बुरशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग परिसरातील तिलारी संवर्धन राखीव क्षेत्राच्या परिसरात पहिल्यांदाच आढळली आहे. पश्चिम घाटावर प्रकाशमान होणारी बुरशी आढळून आली आहे.
8/8
आपण बुरशीचे अनेक प्रकार पाहिले असतील. पण आपण कधीही चमकणारी बुरशी ऐकली किंवा पाहिली आहे का? हो हे खरं आहे की बुरशी देखील प्रकाशमान होते. त्याला बायो-ल्युमिनेसेंट बुरशी म्हणतात. ही दुर्मिळ प्रकाश देणारी बुरशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिलारीच्या जंगलात दिसून आली आहे. ही बुरशी रात्रीच्या अंधारात ही हिरव्या गडद रंगात चमकते.