एक्स्प्लोर

Vinod Tawde : विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल

Vinod Tawde in Virar : भारतीय जनता पक्षाने पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी अतिशय खालची पातळी गाठली आहे. पैसे वाटून जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही वंचितच्या नेत्याने म्हटले आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना मुंबईत मोठी घडामोड झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी विरारमधील एका हॉटेलात 5 कोटी रुपये वाटल्याचा आरोप बविआकडून (BVA) करण्यात आला. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. आता या प्रकरणावरून वंचित बहुजन आघाडीने विनोद तावडेंसह भाजपवर हल्लाबोल केलाय.   

वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी अतिशय खालची पातळी गाठल्याचं या ठिकाणी दिसतंय. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना निवडणूक लढवणे अशक्य केले जात आहे. पैसे वाटून जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत असलेले विनोद तावडे यांच्यासारखे नेते पैशांसोबत हॉटेलमध्ये पकडले जातात ही लाजीरवाणी गोष्ट आहे. 

20 तारखेला जनता योग्य धडा शिकवेल

एकीकडे धनदांडगे आणि जात दांडग्या पक्षांकडून पैशाचा पाऊस पाडून निवडणूक फिरवण्याचा प्रयत्न होतोय. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार घामाच्या कष्टाच्या पैशाने निवडणूक लढत आहेत. पण आमच्या उमेदवारांवर प्राणघातक हल्ले केले जात आहेत. आम्ही या धनदांडग्या पक्षांचा तीव्र निषेध व्यक्त करतो आणि आमच्या उमेदवारांवर हल्ले होत असताना हातावर हात ठेऊन बसलेल्या पोलीस प्रशासनाचाही निषेध करतो. जनता 20 तारखेला या धनदांडग्या पक्षांना योग्य धडा शिकवेल, असे त्यांनी म्हटले आहे.  

विनोद तावडेंची प्रतिक्रिया

या प्रकरणावर विनोद तावडे म्हणाले की, आज नालासोपारामध्ये कार्यकर्त्यांची बैठक होती. या बैठकीत मतदानाच्या दिवशी आचारसंहितेचे नियम काय आहेत? हे सांगण्यासाठी मी इथे आलो होतो. यावेळी आमचे विरोधक हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांचा समज झाला की मी पैसे वाटत आहे. याबाबत निवडणूक आयोगाने नक्कीच चौकशी करावी. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करावी, सीसीटीव्ही चेक करावे, त्यातून सत्य बाहेर येईल. मी 40 वर्षापासून भारतीय जनता पक्षात आहेत. हितेंद्र ठाकूर मला चांगले ओळखतात. सत्य सर्वांना माहिती आहे. परंतु निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!

Sanjay Raut: विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan bhujbal & Devendra Fadnavis : मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी; फडणवीस अन् भुजबळांकडून एकमेकांचं तोंडभरून कौतुक; चर्चांना उधाण
मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी; फडणवीस अन् भुजबळांकडून एकमेकांचं तोंडभरून कौतुक; चर्चांना उधाण
Shubman Gill : तू खेळ, तुला कोण काय बोलणार नाही! कॅप्टनला बाहेर बसवून संघात घेतलेल्या गिलला शाब्दिक डावपेचात चारी बाजूने घेरत क्षणात गेम केला
Video : तू खेळ, तुला कोण काय बोलणार नाही! कॅप्टनला बाहेर बसवून संघात घेतलेल्या गिलला शाब्दिक डावपेचात चारी बाजूने घेरत क्षणात गेम केला
खर्च कोणी केला, कोणत्या सीटवर बसला, किती बॅगा घेऊन जाणार? परदेशात जाताना 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
खर्च कोणी केला, कोणत्या सीटवर बसला, किती बॅगा घेऊन जाणार? परदेशात जाताना 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
''शरद पवार अन् सुप्रिया सुळेंनी घरी बसावं, शेतीबाडी पाहावी, त्यांच्या वांग्याला बरेच पैसे मिळालेत''
''शरद पवार अन् सुप्रिया सुळेंनी घरी बसावं, शेतीबाडी पाहावी, त्यांच्या वांग्याला बरेच पैसे मिळालेत''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbra Marathi vs Hindiमराठी बोलायला सांगणाऱ्या तरुणाला माफी  मागण्याची वेळ Avinash Jadhav संतापलेSupriya Sule PCनैतिकतेच्या पातळीवर धनजंय मुंडे राजीनाम्याबाबत निर्णय व्हावा सुप्रिया सुळेंचं वक्तव्यChandrashekhar Bawankule : 'आमच्यासाठी आनंदाचा दिवस, सामना कधीतरी चांगल लिहिल याची वाट पाहत होतो'Sanjay Raut PC | गडचिरोलीवरून फडणवीसांचं कौतुक एकनाथ शिंदेंना टोला, काय म्हणाले संजय राऊत?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan bhujbal & Devendra Fadnavis : मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी; फडणवीस अन् भुजबळांकडून एकमेकांचं तोंडभरून कौतुक; चर्चांना उधाण
मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी; फडणवीस अन् भुजबळांकडून एकमेकांचं तोंडभरून कौतुक; चर्चांना उधाण
Shubman Gill : तू खेळ, तुला कोण काय बोलणार नाही! कॅप्टनला बाहेर बसवून संघात घेतलेल्या गिलला शाब्दिक डावपेचात चारी बाजूने घेरत क्षणात गेम केला
Video : तू खेळ, तुला कोण काय बोलणार नाही! कॅप्टनला बाहेर बसवून संघात घेतलेल्या गिलला शाब्दिक डावपेचात चारी बाजूने घेरत क्षणात गेम केला
खर्च कोणी केला, कोणत्या सीटवर बसला, किती बॅगा घेऊन जाणार? परदेशात जाताना 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
खर्च कोणी केला, कोणत्या सीटवर बसला, किती बॅगा घेऊन जाणार? परदेशात जाताना 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
''शरद पवार अन् सुप्रिया सुळेंनी घरी बसावं, शेतीबाडी पाहावी, त्यांच्या वांग्याला बरेच पैसे मिळालेत''
''शरद पवार अन् सुप्रिया सुळेंनी घरी बसावं, शेतीबाडी पाहावी, त्यांच्या वांग्याला बरेच पैसे मिळालेत''
Devendra Fadnavis : सामनातून मुख्यमंत्र्यांचं भरभरून कौतुक, देवेंद्र फडणवीसांची दोन शब्दात प्रतिक्रिया!
सामनातून मुख्यमंत्र्यांचं भरभरून कौतुक, देवेंद्र फडणवीसांची दोन शब्दात प्रतिक्रिया!
भाजप राज्यात भाकरी फिरवणार, दोन महिन्यात खुर्ची बदलणार; संघटन पर्व संपताच महाराष्ट्रात नवा चेहरा
भाजप राज्यात भाकरी फिरवणार, दोन महिन्यात खुर्ची बदलणार; संघटन पर्व संपताच महाराष्ट्रात नवा चेहरा
शरद पवारांवर आरोप झाले तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता, सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडेंना टोला
शरद पवारांवर आरोप झाले तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता, सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडेंना टोला
Beed Guardian Minister: बीडचं पालकमंत्रीपद कोणाला मिळणार? अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
बीडचं पालकमंत्रीपद कोणाला मिळणार? अजित पवार मुंबईत येताच निर्णय होणार
Embed widget