एक्स्प्लोर
World's Oldest Person Dies : जगातील सर्वात वृद्ध महिलेचं निधन; ल्यूसिल रँडन यांनी 118 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
World's Oldest Person Death : जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती (World's Oldest Person) आणि फ्रान्सी नन ल्यूसिल रँडन (Lucile Randon) यांचा मृत्यू झाला आहे.

World Oldest Person Death
1/13

ल्यूसिल रँडन यांनी वयाच्या 118 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ल्यूसिल रँडन यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1904 रोजी दक्षिण फ्रान्समध्ये (France) झाला होता.
2/13

मिळालेल्या माहितीनुसार, जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती ल्यूसिल रँडन या 118 वर्षांच्या होत्या, त्यांचं 118 व्या वर्षी निधन झालं आहे.
3/13

प्रवक्ता डेविड तावेल्ला यांनी ही माहिती दिली आहे. रँडन यांचं वृद्धापकाळाने झोपेतच निधन झालं आहे.
4/13

ल्यूसिल रँडन या फ्रान्सच्या दक्षिणेकडील शहर एल्स येथे वास्तव्यास होत्या. त्यांना सिस्टर अँड्र्यू (Sister Andre) नावाने देखील ओळखलं जातं.
5/13

प्रोटेस्टंटवादी कुटुंबात त्यांच्या जन्म झाला आणि त्यांचं बालपण गेलं. रँडन तीन भावांची एकुलती एक लाडकी बहिण होती.
6/13

प्रवक्ता डेविड तावेल्ला यांनी सांगितले की, रँडन यांच्या भावाचा आधीच मृत्यू झाला होता.
7/13

ल्यूसिल यांना त्यांच्या भावांकडे म्हणजे देवाच्या दारी जायचे होते. त्यामुळे ल्यूसिल यांचा मृत्यू त्यांच्यासाठी मुक्ती मिळण्यासारखं आहे.
8/13

रँडन 2021 मध्ये कोविड-19 संसर्गापासून बचावल्या होत्या.
9/13

रँडन यांच्या नर्सिंग होममधील 81 लोकांना कोरोना संसर्ग झाला होता. पण रँडन यांना कोरोनाची बाधा झाली नव्हती.
10/13

मिळालेल्या माहितीनुसार, त्या अंध होत्या आणि व्हीलचेअरवर होत्या.
11/13

असे असले तरीही रँडन त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या इतर वृद्धांची काळजी घ्यायच्या.
12/13

याआधी एप्रिल 2022 मध्ये जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती जपानचे केन तनाका (Kane Tanaka) या महिलेचे निधन झाले होते. वयाच्या 119 व्या वर्षी केन यांनी अखेरचा श्वास घेतला.
13/13

केन यांचा जन्म 2 जानेवारी 1903 रोजी जपानच्या नैऋत्येकडील फुकुओका येथे झाला होता. केन यांचे नाव 2019 मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले. तेव्हा तनाका 116 वर्षांच्या होत्या.
Published at : 18 Jan 2023 02:27 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
