एक्स्प्लोर
Turkey Syria Earthquake : तुर्कीमध्ये सर्वत्र विध्वंस, भूकंपानंतर परिस्थिती काय? पाहा फोटो
Turkiye Syria Earthquake Updates : तुर्की (Turkey) आणि सीरियामध्ये (Syria) विनाशकारी भूकंपानंतर परिस्थिती फार बिकट आहे. भूकंपाच्या 10 दिवसांनंतरही अद्याप बचावकार्य सुरु आहे.
Turkey Syria Earthquake Updates
1/8

तुर्की आणि सीरियामध्ये विनाशकारी भूकंपामुळे येथील घरे आणि इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या. भूकंपामधील मृतांचा आकडा 45 हजारांच्या पुढे गेला आहे.
2/8

तुर्कीमध्ये 38 हजार आणि सीरियामध्ये 5 हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
3/8

मदत आणि बचाव पथकाकडून अद्यापही बचाबकार्य सुरु आहे. भूकंपामध्ये सुमारे 80 हजारहून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
4/8

6 फेब्रुवारी रोजी झालेल्या भीषण भूकंपामुळे तुर्कीमध्ये मोठी हानी झाली होती. याची तीव्रता 7.8 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली होती. या भूकंपाचा डेमिरकोप्रू गावालाही फटका बसला.
5/8

तुर्कस्तानमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे डेमिरकोप्रू गावातील अनेक घरे उद्ध्वस्त झाली. काही घरे 13 फुटांपर्यंत जमिनीत गाडली गेली आहेत.
6/8

तुर्कीच्या डेमिरकोप्रू गावात सुमारे 1,000 घरे आहेत. भूकंपानंतर घरांच्या आजूबाजूला ढिगारे, फुटलेले फुटपाथ आणि उदध्वस्त झालेली घरे दिसत आहेत.
7/8

तुर्कीमधील डेमिरकोप्रू गावातील ग्रे हाऊसचे 42 वर्षीय शेतकरी आणि मालक माहिर कार्तास यांनी सांगितले की, घर 13 फूट जमिनीत बुडाले आणि जमिनीचा काही भाग ढिगाऱ्याखाली आला. तुर्कीमधील डेमिरकोप्रू गावातील भूकंपानंतर शेताजवळील शेडमधील जनावरांचाही मृत्यू झाला आहे.
8/8

डेमिरकोप्रू गावात शेतकरांच्या घराजवळील अर्धा डझनहून अधिक इमारतींचे नुकसान झालं आहे. सुदैवाने, मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असलं तरीही डेमिरकोप्रू गावात जीवितहानी झालेली नाही. पण काही लोक जखमी झाले आहेत.
Published at : 19 Feb 2023 12:53 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















