एक्स्प्लोर
PM Modi US Visit : नमस्ते अमेरिका! पंतप्रधान मोदींचं आजपासून 'मिशन अमेरिका', वॉशिंग्टनमध्ये जंगी स्वागत
Feature_Photo_2
1/11

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर
2/11

भारतीय वेळेनुसार, मध्यरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या वॉशिंग्टन डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले.
3/11

काल (बुधवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेसाठी रवाना झाले होते.
4/11

पंतप्रधान मोदी पेंसिलवेनिया एवेन्यू येथील हॉटेल विलार्ड इंटरकॉन्टिनेंटलमध्ये राहणार आहेत.
5/11

23 सप्टेंबर रोजी, म्हणजेच आज अमेरिकेतील वेळेनुसार, सकाळी 9.40 वाजता (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:15 वाजता) पंतप्रधान मोदी आपल्या हॉटेलमध्ये वेळवेगळ्या CEO सोबत भेटीगाठी करतील.
6/11

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत अमेरिका दौऱ्यात परराष्ट्र मंत्री, एनएसएसह एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील जात आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांची भेट घेणार आहेत.
7/11

मोदी आणि बायडन यांच्यात 24 सप्टेंबर रोजी द्विपक्षीय बैठक होणार असून या बैठकीत पंतप्रधान मोदी आणि बायडन भारत-अमेरिकेतील संबंधांवर चर्चा करतील.
8/11

मोदी आणि बायडन यांच्या बैठकीत दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक संबंध मजबूत करणे, सुरक्षेसंबंधी तसेच स्वच्छ ऊर्जा भागिदारीला प्रोत्साहन देण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते.
9/11

पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचीही भेट घेतील.
10/11

सोबतच या दौऱ्यात क्वाड शिखर परिषद व्हाईट हाऊस येथे आयोजित केली जाईल. जिथे चार देशांच्या (अमेरिका , भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया) नेत्यांची प्रथमच प्रत्यक्ष बैठक होणार आहे.
11/11

अमेरिकेत मोदींचं जंगी स्वागत करण्यात आलं.
Published at : 23 Sep 2021 11:46 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
महाराष्ट्र
सोलापूर



















