एक्स्प्लोर

Bihar Election 2025: बिहार विधानसभेसाठी इंडिया आघाडीकडून CM आणि DCM पदासाठीच्या उमेदवारांची घोषणा; तेजप्रताप यादवांची आश्चर्यजनक प्रतिक्रिया

Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज महाआघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद झाली.

पाटणा : बिहार विधानसभा (Bihar vidhansabha) निवडणुकांसाठी मतदानाची तारीख अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना, आता येथील राजद, काँग्रेस महाआघाडीकडून मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आलं आहे. महाआघाडीने राजदचे प्रमुख आणि माजी मंत्री तेजस्वी यादव (Tejaswi yadav) यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवले आहे. बिहार विधानसभा 2025 साठी महाआघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा (Chief minister) चेहरा म्हणून तेजस्वी यादव यांचे नाव घोषित केल्यानंतर जनशक्ती जनता दलचे प्रमुख आणि त्यांचे बंधू तेजप्रताप यादव यांनी दिलेल्या प्रतिक्रियेने अनकेांच्या भुवया उंचावल्या आहेत.

बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज महाआघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये, काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी आगामी निवडणुकांसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यानुसार, राजदचे नेते तेजस्वी यादव हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील आणि विकासशील इंसान पार्टी (वीआईपी) चे प्रमुख मुकेश सहनी उपमुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, असे त्यांनी सांगितले.  त्यामुळे, बिहारमध्ये महाआघाडीकडून दोन महत्त्वाच्या पदासाठी नावे जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसला काय मिळणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसेच, बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार आल्यास एनडीएप्रमाणेच दोन उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेसला देखील उपमुख्यमंत्रीपद दिले जाऊ शकते किंवा विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसला संधी मिळू शकते.

राहुल गांधींसह आमच्या डोक्यात तेजस्वी यादव यांचेच नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित होते. कारण, गत 2020 च्या निवडणुकीत देखील त्यांनी कमाल केली होती. विजयाच्या उंबरठ्यावर ते पोहोचले होते, पण पैशाच्या जोरावर एनडीएने काही मतांच्या फरकाने सत्ता मिळवली, असेही गेहलोत यांनी म्हटले. 

जेवढी प्रतिक्षा आपल्या सर्वांनी होती, तितकीच प्रतिक्षा मलाही होते, असे म्हणत तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्रीपदासाठी नाव घोषित केल्यानंतर महाआघाडीतील सर्वच पक्षांचे आभार मानले. राज्यातील डबल इंजिनवालं एनडीए सरकार भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीमध्ये अडकून पडलं आहे. आता, नवयुवकांसह नवा बिहार घडवायचा आहे, या सत्ताधाऱ्यांना उखडून फेकायचं आहे, असेही तेजस्वी यादव यांनी म्हटले. दरम्यान, तेजस्वी यांचे बंधू तेजप्रताप यादव यांच्या प्रतिक्रियेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

तेजप्रताप म्हणाले, मुख्यमंत्री जनता ठरवते

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल हे बिहारची जनता ठरवते, नेतेमंडळी थोडंच ठरवतात? असं तेजप्रताप यादव यांनी म्हटलं. त्यावरुन, तेजप्रताप यादव हे मुख्यमंत्रीपदासाठी भाऊ तेजस्वी यांचं नाव जाहीर केल्याने खुश नाहीत, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. 

हेही वाचा

ठाकरे बंधूंची भाऊबीजही एकत्र; 4 महिन्यात कितव्यांदा भेटले राज अन् उद्धव, मनोमिलनाची A टू Z स्टोरी

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Los Angeles Olympics 2028 : पाकिस्तानसाठी आता ऑलिम्पिकचे दरवाजे बंद? ICCने दिला स्पष्ट अपडेट, टीम इंडियाचं काय झालं? जाणून घ्या सर्वकाही
पाकिस्तानसाठी आता ऑलिम्पिकचे दरवाजे बंद? ICCने दिला स्पष्ट अपडेट, टीम इंडियाचं काय झालं? जाणून घ्या सर्वकाही
Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bacchu Kadu Farmers : आरक्षणाच्या लढाईपेक्षा मातीची लढाई गरजेची तरच शेतकरी सुखी होईल
Bacchu Kadu Farmer Protest:  बच्चू कडूंच्या आंदोलनाचं सुरुवात ते शेवट, इनासाईड स्टोरी काय?
Bacchu Kadu Farmers Protest :बच्चू कडूंचा नवा लढा, आता पूर्ण महाराष्ट्रात पायी दौरा करणार
Bacchu Kadu On Farmers Loss : शेतकऱ्यांना चालू वर्षांत कर्जमाफी देणं का गरजेचं? बच्चू कडूंनी गणित मांडलं
Bacchu Kadu On Farmers Protest : राजकारण हललं की बच्चू कडू आंदोलन करतात का? बच्चू कडूंचं उत्तर ऐकाच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Los Angeles Olympics 2028 : पाकिस्तानसाठी आता ऑलिम्पिकचे दरवाजे बंद? ICCने दिला स्पष्ट अपडेट, टीम इंडियाचं काय झालं? जाणून घ्या सर्वकाही
पाकिस्तानसाठी आता ऑलिम्पिकचे दरवाजे बंद? ICCने दिला स्पष्ट अपडेट, टीम इंडियाचं काय झालं? जाणून घ्या सर्वकाही
Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
Maharashtra Live blog: मीरारोड पोलीस ठाण्यातील तरुणांचा सिगारेट पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
Maharashtra Live blog: मीरारोड पोलीस ठाण्यातील तरुणांचा सिगारेट पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
Ajit Pawar & Parth Pawar: शेवटी माणूस अनुभवातूनच शिकतो, यापुढे पार्थ काळजी घेईल; अजित पवारांकडून मुलाची पाठराखण
शेवटी माणूस अनुभवातूनच शिकतो, यापुढे पार्थ काळजी घेईल; अजित पवारांकडून मुलाची पाठराखण
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
Embed widget