एक्स्प्लोर
Advertisement

PHOTO : थायलंडच्या 'नट्टी द युट्यूबर'ने चाहत्यांना घातला 575 कोटी रुपयांचा गंडा
नथामोन खोंगचाक ही नट्टी द युट्यूबर या नावाने प्रसिद्ध असून तिने तिच्या प्रसिद्धीचा फायदा घेत चाहत्यांना गंडवलं आहे.

Natthamon Khongchak
1/10

थांयलडची स्टार युट्यूबर नथामोन खोंगचाक उर्फ नट्टी द युट्यूबरने तिच्या चाहत्यांना 575 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचं समोर आलं आहे.
2/10

आपल्या प्रसिद्धाचा फायदा घेत या युट्यूबरने कमी वेळात मोठा परतावा देतो असं आश्वासन देत हजारो चाहत्यांना फसवलं आणि तिने पैसा घेऊन पोबारा केला असल्याचं समोर आलं.
3/10

या गोष्टीचा फटका तब्बत 6000 चाहत्यांना बसला असून त्यांचे पैसे बुडाले आहेत.
4/10

नथामोन खोंगचाक उर्फ नट्टी द युट्यूबर ही थायलंडमधील सोशल मीडियातील इन्फ्लुएंसर असून युट्यूबवर तिचे जवळपास आठ लाख फॉलोअर्स आहेत.
5/10

पाच महिन्यांपूर्वी तिने तिच्या चाहत्यांना कमी कालावधीत जास्त पैसा कमावण्यासाठी तिच्याकडे काही स्कीम असल्याचं सांगितलं.
6/10

या स्कीमचा फायदा घ्यायचा असेल तर चाहत्यांनी आपल्या अकाउंटमध्ये पैसे जमा करावं असंही आवाहन तिने केलं.
7/10

नट्टी द युट्यूबर तिच्या चाहत्यांना पैसा कमावण्याच्या तीन स्कीम्स सांगितल्या. त्यामध्ये तीन महिन्यात 25 टक्के परतावा, सहा महिन्यात 30 टक्के आणि एका वर्षात 35 टक्के परतावा देण्याचं आश्वासन दिलं
8/10

यामध्ये प्रत्येक महिन्याला पैसे मिळतील असं तिने तिच्या चाहत्यांना सांगितलं होतं. त्याप्रमाणे एप्रिलपर्यंत पैसे मिळतही होते. पण त्यानंतर मात्र कुणालाही पैसा मिळाला नाही.
9/10

मे महिन्यात तिने एक इन्स्टाग्राम पोस्ट लिहिली आणि चाहत्यांनी गुंतवलेला सर्व पैसा बुडाला असं सांगितलं. ट्रेडिंग करताना आपली चूक झाली आणि सर्व पैसा बुडाल्याची कबुली दिली.
10/10

नथामोन खोंगचाक हिने काही महिन्यांपूर्वी या नावाने आपला शेवटचा युट्यूब व्हिडीओ शेअर केला होता.
Published at : 31 Aug 2022 11:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
