एक्स्प्लोर
अंतराळात लग्न, तिकीट तब्बल 1 कोटींचं; 'ही' कंपनी करणार अनोखा कारनामा!
Space Wedding: लग्नाबाबत अनेकजण स्वप्न पाहतात... ग्रँड वेडिंग करावं किंवा स्वतःच्या लग्नात हटके काहीतरी करावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते.
Space Wedding
1/8

पण तुमच्यापैकी कधी कोणी अंतराळात लग्न करण्याचा विचार केलाय का? आता पहिला प्रश्न तुमच्या मनात आला असेल की, काही काय बोलता? शक्य तरी आहे का? पण हा विचार तुम्ही डोक्यातूनच काढून टाका. आता अंतराळात लग्न करणं शक्य आहे.
2/8

एक अमेरिकन कंपनी 2024 पर्यंत लोकांना अंतराळात लग्न करण्याची संधी देणार आहे. अंतराळात लग्न करण्याचा एक फायदा असाही होईल की, पृथ्वीवर लग्न करण्याचा अतिरिक्त त्रास टाळला जाईल. कंपनी 2024 पर्यंत हा उपक्रम सुरू करणार असल्याचा दावा कंपनीच्या वतीनं करण्यात आला आहे.
3/8

अमेरिकेच्या स्पेस पर्स्पेक्टिव्ह कंपनीनं स्पेस वेडिंगच्या अनोख्या पद्धतीचा विचार केला आणि त्यावर काम सुरू केलं आहे. अंतराळात लग्न करण्यासाठी कंपनी कार्बन न्यूट्रल बलूनमध्ये बसून जोडप्यांना अंतराळात घेऊन जाईल. दरम्यान, अंतराळातून पृथ्वीचं सुंदर रुप पाहण्याचीही कंपनी पूर्ण व्यवस्था करणार आहे.
4/8

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीनं अंतराळात लग्नाची संधी उपलब्ध करुन दिल्यापासूनच कंपनीकडे जोडप्यांनी फोन करुन त्यासाठी आपली नोंदणी केली आहे.
5/8

अंतराळात लग्न करण्यासाठी अनेक जोडपी उत्सुक असून त्यांनी नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे, असं कंपनीच्या वतीनं सांगण्यात येत आहे.
6/8

कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, ही एक स्पेसशिप नेप्च्यून फ्लाईट सफर असेल, ज्यासाठी 6 तासांचा वेळ लागले. ज्यामध्ये पाहुण्यांना पृथ्वीपासून सुमारे एक लाख फूट उंचीवर नेण्यात येणार आहे. या खास विवाहाचा अनुभव घेण्यासाठी, जोडपं 2024 च्या अखेरीस Space Perspective च्या वेबसाइटवर नोंदणी करू शकतात.
7/8

स्पेस वेडिंग करण्यासाठी किती रुपये लागणार याचा विचार करत असाल तर, कंपनीनं सांगितलंय की, नेपच्यूनमधून प्रवास करण्यासाठी एका प्रवाशाला 125,000 डॉलर म्हणजे, जवळपास 10,283,250 रुपये मोजावे लागतील.
8/8

स्पेस क्राफ्टमध्ये पाहुण्यांसाठी रिफ्रेशमेंट, वाय-फाय, टॉयलेट आणि फ्लोटिंग लाऊंजची सुविधा देण्यात येईल.
Published at : 25 Jun 2023 11:10 AM (IST)
आणखी पाहा























