एक्स्प्लोर

मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, चंद्रकांत बावकर, जे डी तांडेल यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीनंतर आघाडीची घोषणा करण्यात आली.

Congress Alliance With OBC bahujaj Aghadi: नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसने वंचित बहुजन आघाडी सोबत आघाडी करताना लातूर महापालिका काबीज केली. राज्यामध्ये विविध मनपा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात या आघाडीला यश मिळालं. दरम्यान आता वंचितला सोबत घेतल्यानंतर आणखी एक पक्ष काँग्रेसने सोबत घेतला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेसने ओबीसी बहुजन आघाडीसोबत आघाडीची घोषणा केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, चंद्रकांत बावकर, जे डी तांडेल यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीनंतर आघाडीची घोषणा करण्यात आली. या बैठकीसाठी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील ऑनलाईन उपस्थित होते. 

वारे कोणत्या देशाने वाहत आहे ते लक्षात घ्या

आघाडी झाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी चांगलाच हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ओबीसींचा केलेला विश्वासघात लक्षात आल्यानंतर आता ओबीसी काँग्रेस सोबत येत आहे. वारे कोणत्या देशाने वाहत आहे ते लक्षात घ्या असा इशारा त्यांनी दिला. त्यांनी सांगितले की हा आमचा संघर्षाचा काळ असून वैचारिक पातळीवर आम्ही एकत्रित आलो आहोत. दरम्यान, हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हॉटेल पॉलिटिक्सवर सुद्धा जोरदार टीका केली. ते म्हणाले की हॉटेल पॉलिटिक्स त्यांची राजकीय शैली असेल. मात्र, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत सदस्यांना सुद्धा हॉटेलमध्ये ते घेऊन जाणार का? लोकशाहीवर विश्वास नाही का? अशी विचारणा केली. एकनाथ शिंदे यांच्याकडून भाकरी फिरवण्याची शक्यता नसल्याचं ते म्हणाले. त्यांच्याकडून अपेक्षा नसल्याचेही ते म्हणाले. 

समविचारी पक्षांसोबत आम्ही जात आहोत

प्रकाश शेंडगे आघाडीची घोषणा होताच म्हणाले की शासन निर्णय काढून ओबीसींच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. 27% आरक्षण ओबीसींना मिळाले. मात्र, त्यावर घाला घालण्याचं काम केलं जात आहे. कुणबी दाखले देण्याचे काम केलं जात आहे. ओबीसी बहुजन आघाडी आता पक्ष निर्माण झाला असून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक लढवण्याचा आम्ही ठरवलं आहे. समविचारी पक्षांसोबत आम्ही जात आहोत. आरक्षणाचा मुद्दा असेल, आमचे प्रश्न असतील, यावर आवाज उठवण्याचं काम राहुल गांधी यांनी केलं असल्याचे त्यांनी सांगितलं. आमची चर्चा मागील दोन दिवसापासून सुरु होती.. काँग्रेससोबत सगळी चर्चा झाली आणि त्यानंतर जिथं जिथं शक्य तिथं तिथं जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये काँग्रेस आणि ओबीसी बहुजन आघाडी एकत्र निवडणूक लढवतील, अशी घोषणा त्यांनी केली. 

इतर महत्वाच्या बातम्या

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar ZP Election Result: मावळमध्ये सुनील शेळकेंचा डंका, सगळ्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, अजितदादांची आठवण येताच डोळे पाणावले
मावळमध्ये सुनील शेळकेंचा डंका, सगळ्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, अजितदादांची आठवण येताच डोळे पाणावले
Satara ZP Election : शिवेंद्रराजे भोसले यांना कुसुंबी गटात धक्का, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणेंच्या पत्नी अर्चना रांजणेचा पराभव
शिवेंद्रराजे भोसले यांना कुसुंबी गटात धक्का, अर्चना रांजणेंचा पराभव, जावळीतून धक्कादायक निकाल
मोठी बातमी! शरद पवारांना खोकल्याचा त्रास, पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली माहिती
मोठी बातमी! शरद पवारांना खोकल्याचा त्रास, पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली माहिती
Jaykumar Gore : जयकुमार गोरे यांना दोन धक्के, भारती गोरेंचा औंध तर अरुण गोरे यांचा कुकुडवाड गटातून पराभव, सोनल गोरे आंधळी गटातून विजयी
जयकुमार गोरे यांना दोन धक्के, भारती गोरेंचा औंध तर अरुण गोरे यांचा कुकुडवाड गटातून पराभव, सोनल गोरे आंधळी गटातून विजयी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar Health Update : शरद पवार होतोय श्वसनाचा त्रास, रुबी रुग्णालयात केलं दाखल
Ram Satpute On ZP Election : मोहिते पाटील आणि जानकरांना घरात बसवलं- राम सातपुते
Avinash Jadhav : एक दिवस असा येईल की भाजपला एक जागा आणायलाही कसर करावी लागेल
Bharat Gogawale ZP Celebration : जिल्हा परिषदेत लेकाचा विजय, भरत गोगावलेंचं विजयी सेलिब्रेशन
Bharat Gogawale On Vikas Gogawale : भरतशेठला कुणीही हरवू शकत नाही, मुलाच्या विजयावर प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar ZP Election Result: मावळमध्ये सुनील शेळकेंचा डंका, सगळ्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, अजितदादांची आठवण येताच डोळे पाणावले
मावळमध्ये सुनील शेळकेंचा डंका, सगळ्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, अजितदादांची आठवण येताच डोळे पाणावले
Satara ZP Election : शिवेंद्रराजे भोसले यांना कुसुंबी गटात धक्का, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणेंच्या पत्नी अर्चना रांजणेचा पराभव
शिवेंद्रराजे भोसले यांना कुसुंबी गटात धक्का, अर्चना रांजणेंचा पराभव, जावळीतून धक्कादायक निकाल
मोठी बातमी! शरद पवारांना खोकल्याचा त्रास, पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली माहिती
मोठी बातमी! शरद पवारांना खोकल्याचा त्रास, पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली माहिती
Jaykumar Gore : जयकुमार गोरे यांना दोन धक्के, भारती गोरेंचा औंध तर अरुण गोरे यांचा कुकुडवाड गटातून पराभव, सोनल गोरे आंधळी गटातून विजयी
जयकुमार गोरे यांना दोन धक्के, भारती गोरेंचा औंध तर अरुण गोरे यांचा कुकुडवाड गटातून पराभव, सोनल गोरे आंधळी गटातून विजयी
Kolhapur ZP Election Result: ऐनवेळच्या पक्षांतराने 'विश्वास' गमावला? गोकुळचे माजी अध्यक्ष आबाजी पाटलांच्या मुलाचा दारुण पराभव; तिकडं अरुण डोंगळेंच्या मुलीनं विजय खेचून आणला
ऐनवेळच्या पक्षांतराने 'विश्वास' गमावला? गोकुळचे माजी अध्यक्ष आबाजी पाटलांच्या मुलाचा दारुण पराभव; तिकडं अरुण डोंगळेंच्या मुलीनं विजय खेचून आणला
मोहिते पाटलांसाठी कही खुशी कही गम, माळशिरसमध्ये अर्जुनसिंहांचा जिल्हा परिषदेवर विजय, पण...
मोहिते पाटलांसाठी कही खुशी कही गम, माळशिरसमध्ये अर्जुनसिंहांचा जिल्हा परिषदेवर विजय, पण...
Chhatrapati Sambhajinagar ZP Result: अब्दुल सत्तारांचे चिरंजीव जिल्हा परिषदेच्या आखाड्यात विजयी; अंभई गटातून भाजपच्या उमेदवाराला पाडलं
अब्दुल सत्तारांचे चिरंजीव जिल्हा परिषदेच्या आखाड्यात विजयी; अंभई गटातून भाजपच्या उमेदवाराला पाडलं
ZP Election Result 2026: भाजप नंबर 1, शिंदे गटही शंभरी पार; जिल्हा परिषदेतील 500 जागांचा चक्रावणारा निकाल, कुणाला किती जागा?
भाजप नंबर 1, शिंदे गटही शंभरी पार; जिल्हा परिषदेतील 500 जागांचा चक्रावणारा निकाल, कुणाला किती जागा?
Embed widget