ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. मुंबईसह 29 महापालिकेतील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारीला; नगरविकास विभागाचं पत्र जाहीर,महापौर पदाचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर नव्या समीकरणांची शक्यता https://tinyurl.com/ycptj8sb महापौर पदासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गाचं आरक्षण निघाल्यास मुंबई महापालिकेत ठाकरेंचाच महापौर होण्याची शक्यता,ठाकरेंकडे दोन हुकूमी एक्के, महापौर आरक्षण सोडतीने धाकधूक वाढवली! https://tinyurl.com/mrxakyh3
2. बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षात मुंबईत शिवसेनेचा महापौर व्हावा ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते,एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/2pze6pcc महापालिका निवडणुकीत मुंबईकरांची महायुतीला पसंती, जनमताचा अनादर करणार नाही, मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत महायुतीचा महापौर होणार, एकनाथ शिंदेंची माहिती https://tinyurl.com/hkbtbsbz ठाण्यात भाजपला दोन वर्ष महापौरपद मिळावं,आमदार निरंजन डावखरेंची मागणी https://tinyurl.com/yb53zyhy
3. मुंबईत बिहार भवन उभारणार, 30 मजली टोलेजंग इमारत, बिहार सरकारचा मोठा प्लॅन https://tinyurl.com/ef2vpn8d मुंबईत बिहार भवन होऊ देणार नाही; मनसेचे नवनिर्वाचित नगरसेवक यशवंत किल्लेदार यांचा इशारा https://tinyurl.com/mub949e2 महाराष्ट्रात बिहार भवन होत असेल तर गैर वाटायचं कारण काय? भाजपच्या नवनाथ बन यांचा मनसेला सवाल https://tinyurl.com/bdf7benb
4. एकनाथ शिंदेंनी मालेगाव महापालिकेत एमआयएमला पाठिंबा मागितला; इम्तियाज जलील यांचा खळबळजनक दावा https://tinyurl.com/2zbenrtt न्याय श्रीमंतासाठी वेगळा का? गरीब नगरसेवकावर गुन्हा,पण मंत्री संजय शिरसाठांच्या मुलीवर का नाही? इम्तियाज जलील यांचा सवाल, हर्षदा शिरसाट यांनी विजयी मिरवणुकीत नाचवलेली तलवार https://tinyurl.com/yc3cuw44
5. चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेसोबत दोनवेळा चर्चा, आम्ही त्यांना महापौर पद देण्यास नकार दिलाय, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती https://tinyurl.com/36rdrerv पडद्यामागच्या गोष्टी जाहीर करु शकत नाही, सतेज पाटील यांचं कोल्हापुरात शिंदेंच्या शिवसेनेला सोबत घेण्याबाबत सूचक वक्तव्य https://tinyurl.com/2rz64v84
6. उमेदवारी अर्जासाठीही उधार पैसे घेत निवडणूक लढला, असदुद्दीन ओवैसींचा विश्वास सार्थ ठरवला, मुंबईच्या गोवंडीत एमआयएमच्या विजय उबाळेंचा दणदणीत विजय https://tinyurl.com/yrxdc5t5
7. अमरावती महापालिकेत युवा स्वाभिमानला सोबत घेऊनही भाजप मॅजिफ फिगरपासून दूर, महापौर पदाचा तिढा वाढला,राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना, बसपाची मदत घ्यावी लागणार https://tinyurl.com/zwypm957
8. भाजपला आज नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार; कार्याध्यक्ष नितीन नवीन यांची वर्णी लागणार, अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु https://tinyurl.com/ye25m7hz
9. चांदीच्या दरानं 3 लाखांचा टप्पा ओलांडला, आजवरचा विक्रमी दर गाठला, सोन्यालाही झळाळी, एक तोळ्यासाठी 1 लाख 48 हजार रुपये मोजावे लागणार https://tinyurl.com/5assrvzw
10. टी 20 वर्ल्ड कपचे सामने भारतात खेळा अन्यथा बाहेर व्हा, आयसीसीनं दिला बांग्लादेशला निर्वाणीचा इशारा, निर्णयासाठी 21 जानेवारीची मुदत https://tinyurl.com/4r9dvyn2
एबीपी माझा स्पेशल
महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत धडाकेबाज पॉडकास्ट, पाहा कॉफी विथ कौशिक, आज रात्री 8 वा. @abpmajhatv वर https://x.com/abpmajhatv/status/2013222677960683791?s=20
आम्ही जनतेमध्ये गेलो, जनतेचा आवाज बनलो, येणाऱ्या काळात पण आम्ही तेच काम करणार, मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य https://tinyurl.com/2pe2t4mw
पालघरमध्ये माकपच्या लाँग मार्चला सुरुवात,शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह 12 मुद्यांसाठी माकपचा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा https://tinyurl.com/6d6akd4k
एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

























