एक्स्प्लोर
Kalyan Accident : कल्याणच्या गांधारी पुलावर भीषण अपघात, डंपर कठडा तोडून नदीत कोसळला, महिलेचा जागीच मृत्यू
Kalyan Accident : कल्याणच्या गांधारी पुलावर भीषण अपघात झाला आहे. डंपरने रिक्षाला जोरदार धडक दिल्यानंतर डंपर पुलाचे कठडे तोडून नदीत कोसळला.
Kalyan Accident
1/10

कल्याण पश्चिम येथील गांधारी पुलावर भीषण अपघात झालाय.
2/10

रिक्षाला धडक देऊन डंपर पुलाचे कठडे तोडून नदीत कोसळला.
3/10

या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
4/10

जखमीला कल्याणच्या खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
5/10

बापगाववरून निलेश वानखेडे हा रिक्षचालक आपल्या आईला कल्याणला रिक्षाने घेऊन जात होता.
6/10

यावेळी कल्याण पश्चिम येथील गांधारी पुलावर डंपरने रिक्षाला जोरदार धडक दिली.
7/10

यात रिक्षा चालकाची आई मंगल वानखेडे हिचा जागीच मृत्यू झाला.
8/10

रिक्षाचालक निलेश वानखेडे गंभीर जखमी झाला आहे.
9/10

हा अपघात एवढा भीषण होता की, रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
10/10

रिक्षाला धडक दिल्यानंतर डंपर पुलाचे कठडे तोडून नदीत कोसळला आहे. घटनास्थळी कल्याण खडकपाडा पोलीस दाखल झाले आहेत.
Published at : 20 May 2025 09:25 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























