कोरोनाच्या संकटामुळे भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राचं मोठं नुकसान झाल्यानंतर सर्व कार कंपन्या आपली नवीन उत्पादने बाजारात आणत आहेत. लक्झरी कार कंपन्या यात मागे नाहीत. येत्या काही महिन्यांत कोणती लक्झरी कार भारतात लॉन्च होणार, या कारची किंमत आणि वैशिष्ट्ये काय असतील आहेत पाहुयात.
2/5
Land Rover Range Rover Sports 5.0 SVR लँड रोव्हरची ही कार डिसेंबर 2021 मध्ये भारतीय लॉन्च होणार आहे. या कारची किंमत अंदाजे 2.10 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. उत्तम वैशिष्ट्यांसह सज्ज असणारी लोकांच्या पसंतीस उतरेल असा कंपनीला विश्वास आहे. या कारमध्ये अॅडवान्स सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.
3/5
Mercedes Benz S-Class 2021 लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज यावर्षी भारतीय बाजारात अनेक जबरदस्त कार आणण्याच्या तयारीत आहे. यापैकी एक कार Mercedes Benz S-Class 2021 आहे. या कारला या महिन्यात लॉन्च केले जाऊ शकते. या कारची किंमत अंदाजे अडीच कोटी रुपये आहे. कारची डिझाईन खूपच आकर्षक असून यात आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.
4/5
BMW M3 बीएमडब्ल्यूची ही लक्झरी कार जून महिन्यात लॉन्च केली जाऊ शकते. या कारची किंमत अंदाजे 65 लाख रुपये आहे. या कारमध्ये कारमध्ये पॉवरफुल इंजिन आणि उत्कृष्ट इंटिरियर असणार आहे. या कारमध्ये सेफ्टी फीचर्सवरही लक्ष देण्यात आलं आहे.
5/5
Aston Martin DBS Superleggera या सुपर लक्झरी कारला यावर्षी जूनमध्ये लॉन्च केले जाऊ शकते. या कारची किंमत 5 कोटी असल्याचे समजते. या कारचं इंटिरियर रॉयल लूक देते. वेगाचे आवड असणाऱ्या लोकांसाठी ही कार उत्कृष्ट पर्याय ठरू शकते.