एक्स्प्लोर
Solapur Rain : सोलापुरात अवकाळी पावसाचा धुमाकूळ!
Solapur Rain : सोलापूर (solapur) जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळं झाडे उन्मळून पडली आहेत.

Solapur Rain
1/10

राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (Unseasonal rain) हजेरी जोरदार हजेरी लावली आहे.
2/10

अनेक ठिकाणी या पावसामुळं नुकसान झालं आहे. दरम्यान, सोलापूर (solapur) जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला.
3/10

सोलापूर शहरासह अक्कलकोट, मोहोळ, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा या तालुक्यात पावसानं हजेरी लावली.
4/10

कुठे शेती पिकांना फटका बसलाय तर कुठे घरांचं नुकसान झालंय.
5/10

तर अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळं झाडे उन्मळून पडली आहेत.
6/10

विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं सोलापूर शहरात अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत.
7/10

यामुळं काही ठिकाणी वाहतूक व्यवस्था खोळंबली होती. अग्निशमन दलाचे जवळपास 20 जवान झाडे वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करत होते.
8/10

अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. महावितरणच्या विद्युत यंत्रणाचे मोठे नुकसान झाले आहे.
9/10

शहरात 20 ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत तर जवळपास 70 ठिकाणी विजेच्या तारा तुटून पडल्या आहेत. त्यामुळं सोलापुरातल्या अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
10/10

ग्रामीण भागात झालेल्या पावसानं शेती पिकांचं नुकसान झालं आहे.
Published at : 29 Apr 2023 12:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
क्रिकेट
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
