जमीयत ए अहले हदिस यांच्या वतीने आयोजित मशीद परिचय या उपक्रमाचे उद्घाटन सोलापूर पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्या हस्ते पार पडले.
2/7
इस्लाम धर्मियांचा प्रार्थना स्थळ असलेल्या मशिदीची ओळख सर्वसामान्य नागरिकांना व्हावी या उद्देशाने दरवर्षी हा कार्यक्रम घेण्यात येतो.
3/7
यंदाच्या वर्षी देखील हा उपक्रम चार हुतात्मा चौक समोरील हाजी हजरत खान मस्जिद या ठिकाणी राबविण्यात येतं आहे.
4/7
मुस्लिम बांधवाचे प्रार्थना स्थळ असलेल्या मस्जिद विषयी अनेकांच्या मनामध्ये कुतूहल असते. मशीद म्हणजे काय? तिथे काय नेमकं काय केलं जातं? अजान, वजु, नमाज म्हणजे काय? असे विविध प्रश्न सर्वसामान्य मुस्लिमेतर बांधवाच्या मनात असतात. याचं प्रश्नांची उकल व्हावी तसेच सोलापुरात सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी मेक इंडिया बेटर कॅम्पेन अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन केले.
5/7
सोलापूर शहर पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पोलिस आयुक्त राजेंद्र माने यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवररानी मशीदबाबत अगदी उत्सुकतेने माहिती जाणून घेतली. प्रारंभी जमीयतच्यावतीने पोलिस आयुक्त राजेंद्र माने यांच्यासह सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
6/7
मस्जिद परिचय हे उपक्रम 15 ते 17 ऑगस्ट दरम्यान दुपारी साडेतीन ते रात्री १० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.
7/7
चार हुतात्मा चौक समोरील हाजी हजरत खान मशीद या ठिकाणी हे उपक्रम आयोजित केले आहे. तब्बल 104 वर्ष जुनी अशी ही मशीद आहे. हे उपक्रम सर्वधर्मीय नागरिकांसाठी असून महिलांसाठी देखील मशीदीत प्रवेश खुला असणार आहे.