एक्स्प्लोर
Navratri 2023 : रुक्मिणीमातेला मारवाडी पोशाख तर विठुराया नटला पारंपरिक हिरेजडित दागिन्यात; पाहा पंढरपूर विठ्ठल मंदिरातील फोटो
शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात विठुराया आणि रुक्मिणी मातेला विशेष पोषाख, दागिन्यांनी सजवण्यात आले आहे.
![शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात विठुराया आणि रुक्मिणी मातेला विशेष पोषाख, दागिन्यांनी सजवण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/16/93433c314b05bf190c679fd6d907c6131697463441835290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Navratri 2023 : रुक्मिणीमातेला मारवाडी पोशाख तर विठुराया नटला पारंपरिक हिरेजडित दागिन्यात; पाहा पंढरपूर विठ्ठल मंदिरातील फोटो
1/9
![शारदीय नवरात्र महोत्सवाला विठ्ठल मंदिरात मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली असून आज दुसऱ्या माळेला रुक्मिणी मातेला मारवाडी पोशाखात पूजा बांधली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/16/f4c376086576927407d48ae55c3ec67a69900.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शारदीय नवरात्र महोत्सवाला विठ्ठल मंदिरात मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली असून आज दुसऱ्या माळेला रुक्मिणी मातेला मारवाडी पोशाखात पूजा बांधली आहे.
2/9
![रुक्मिणी मातेला नखशिखांत हिरेजडित दागिन्याने नटविण्यात आले असून विठुरायाला पारंपरिक आणि ठेवणीतील हिरेजडित दागिन्याने नटविण्यात आले आहे .](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/16/0c2b2e2f5625c99185f9f625e53546d865cf3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रुक्मिणी मातेला नखशिखांत हिरेजडित दागिन्याने नटविण्यात आले असून विठुरायाला पारंपरिक आणि ठेवणीतील हिरेजडित दागिन्याने नटविण्यात आले आहे .
3/9
![आज रुक्मिणीमातेला मारवाडी पोशाख करताना भरजरी लाल, पिवळ्या रंगाचा घागरा आणि हिरव्या रंगाच्या चोलीवर अंजिरी रंगाची चुनरी असा देखणा पोशाख परिधान करण्यात आला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/16/d52d95c4ef25d2ec8a33aa80bb4c38b9e7cdf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज रुक्मिणीमातेला मारवाडी पोशाख करताना भरजरी लाल, पिवळ्या रंगाचा घागरा आणि हिरव्या रंगाच्या चोलीवर अंजिरी रंगाची चुनरी असा देखणा पोशाख परिधान करण्यात आला होता.
4/9
![यावर नखशिखांत मारवाडी पद्धतीतील अतिशय मौल्यवान अशा हिरे मोत्याच्या दागिन्याने नटविण्यात आले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/16/f6a3041fbc5ef3f1f21710e55c54d21cd913a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावर नखशिखांत मारवाडी पद्धतीतील अतिशय मौल्यवान अशा हिरे मोत्याच्या दागिन्याने नटविण्यात आले होते.
5/9
![यात रूळ, पैंजण, चिंचपेटी, मोहरांची माळ, कंबरपट्टा, हायकोल, मोत्यांचे मंगळसूत्र, मोत्यांचा कंठ, सरी, बाजीराव गरसोळीचा समावेश होता. त्याशिवाय, ठुशी, तन्मणी, झेला, भोर, तारामंडळ, मण्या मोत्यांच्या पाटल्या, सोन्या मोत्याची तारवड, मोत्यांची नथ, बाळ्या , सोन्याचे बाजूबंद असे 22 प्रकारचे हिरेजडित दागिने परिधान करण्यात आलेले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/16/d34fe7449ec36ecca33061a7d5b5ef7424625.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यात रूळ, पैंजण, चिंचपेटी, मोहरांची माळ, कंबरपट्टा, हायकोल, मोत्यांचे मंगळसूत्र, मोत्यांचा कंठ, सरी, बाजीराव गरसोळीचा समावेश होता. त्याशिवाय, ठुशी, तन्मणी, झेला, भोर, तारामंडळ, मण्या मोत्यांच्या पाटल्या, सोन्या मोत्याची तारवड, मोत्यांची नथ, बाळ्या , सोन्याचे बाजूबंद असे 22 प्रकारचे हिरेजडित दागिने परिधान करण्यात आलेले आहेत.
6/9
![आजचा रुक्मिणी मातेचा हा मारवाडी पोशाख पाहण्यासाठी शेकडो भाविकांनी मंदिरात गर्दी केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/16/0c2b2e2f5625c99185f9f625e53546d8fb1ed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आजचा रुक्मिणी मातेचा हा मारवाडी पोशाख पाहण्यासाठी शेकडो भाविकांनी मंदिरात गर्दी केली आहे.
7/9
![नवरात्री निमित्त आज विठुरायाला पारंपरिक हिरेजडित दागिन्यात नटविण्यात आल्याने देवाचे रूप खूपच गोजिरे दिसत होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/16/f7b9514b57b2c734355eb74b444a4f2faa036.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नवरात्री निमित्त आज विठुरायाला पारंपरिक हिरेजडित दागिन्यात नटविण्यात आल्याने देवाचे रूप खूपच गोजिरे दिसत होते.
8/9
![देवाला मरून रंगाची मखमली अंगी आणि पोपटी मखमली धोतर अशा पोशाखात नटलेल्या देवाच्या मस्तकी सोन्याचा हिरेजडित मुकुट, कंठी कौस्तुभ मणी, दंडपेट्या, मोत्यांच्या कंठी, शिरपेच , मोत्याचा तुरा, कानात मत्स्यजोड आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/16/c3a39fb58e9496330090d9ad3667a5f0a44ae.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देवाला मरून रंगाची मखमली अंगी आणि पोपटी मखमली धोतर अशा पोशाखात नटलेल्या देवाच्या मस्तकी सोन्याचा हिरेजडित मुकुट, कंठी कौस्तुभ मणी, दंडपेट्या, मोत्यांच्या कंठी, शिरपेच , मोत्याचा तुरा, कानात मत्स्यजोड आहे.
9/9
![मोठी बोरमाळ, तुळशीची माळ, मारवाडी सोन्याचा करदोडा, तोडे जोड, सोन्याची तुळशीमाळ आणि सोन्याचे पैंजण अशा अनमोल अलंकार विठुरायाचे साजरे रूप अतिशय उठून दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/16/c9df301abad69cf202b254d6528abd3a8ba39.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोठी बोरमाळ, तुळशीची माळ, मारवाडी सोन्याचा करदोडा, तोडे जोड, सोन्याची तुळशीमाळ आणि सोन्याचे पैंजण अशा अनमोल अलंकार विठुरायाचे साजरे रूप अतिशय उठून दिसत आहे.
Published at : 16 Oct 2023 07:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्रिकेट
बीड
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)