एक्स्प्लोर
Pandharpur : विठुराया गुराखी तर रुक्मिणी माता नखशिखांत दागिन्यांनी विजयलक्ष्मीच्या रूपात सजली
Dasara 2023 : आज दसऱ्याला अत्यंत आकर्षक पद्धतीने सजविलेले देवाचे हे रूप पाहण्यासाठी हजारो भाविकांनी विठ्ठल मंदिरात गर्दी केली.

Dasara 2023
1/7

आज दसरा, साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त, आजच्या सोहळ्या निमित्त विठुरायाला पारंपरिक पद्धतीने गुराख्याच्या पोशाखात सजविण्यात आले आहे. तर रुक्मिणी मातेला नखशिखांत सोन्याने मढविलेल्या विजयलक्ष्मीच्या रूपात पूजा बांधण्यात आली आहे .
2/7

विठुरायाला आज सोन्याचे धोतर, अंगावर निळी मखमली अंगी, खांद्यावर खास रेशमी घोंगडी, डोक्यावर सोन्याची पगडी आणि हातात चांदीची काठी आणि तब्बल 22 प्रकारचे ठेवणीतील हिरेजडित मौल्यवान दागिन्याने नटविण्यात आले आहे .
3/7

यामध्ये सोन्याची पगडी , सोन्याचे पितांबर , अनमोल कौस्तुभ मणी , हिऱ्याचे कंगन जोड , हिरेजडित दंडपेट्या , निळाचा नाम , मोत्याची कंठी , शिरपेच , नवरत्नांचा हार , चांदीची काठी , पानड्याचा हार , तोडे जोड , हिऱ्यांचे पैंजण , मोहरांची माळ , सोन्याची तुळशी माळ , मोहरांची माळ , मोत्यांचा तुरा , पुतळ्यांची माळ , मत्स्य जोड , लफ्फा , बाजीराव कंठी असे अनमोल दागिने परिधान केले आहेत.
4/7

रुक्मिणी मातेला आज दसऱ्याच्या दिवशी भगवी भरजरी पैठणी त्यावर सोन्याची साडी आणि नखशिखांत सोन्याच्या दागिन्याने मढविण्यात आले होते. रुक्मिणी मातेला आज तब्बल 31 प्रकारचे ठेवणीतील पुरातन दागिने परिधान करण्यात आले होते .
5/7

यात मातेला जडावाचा मुकुट , जडावाचा हार , नवरत्नांचा हार , बाजूबंद , खड्याची वेणी , पाचूची गरसोळी , चिंचपेटी , तन्मणी , चंद्रहार , दशावतारी हार , मासपट्टा , तुळशीचा हार , जडावाचे तानवड जोड , चंद्र , सूर्य , बाजीराव गरसोळी , पेट्यांची बिंदी अशा दागिण्यांनी सजवलं,
6/7

तसेच खड्याचा पाटली जोड , मोत्याचे मंगळसूत्र , मोत्याचा तुरा , सोन्याचे बाजूबंद , मत्स्य जोड , पैन्ज जोड , सोन्याचा करंडा , मोठी नथ , कर्णफुले , छत्र चामर , तोडे , शिंदेहार , हातसर जोड असे तब्बल ३१ प्रकारच्या दागिन्याने रुक्मिणीमाता विजयालक्ष्मीच्या रूपात सजली होती.
7/7

गेले नऊ दिवस सुरु असलेल्या नवरात्र महोत्सवात रोज विठुराया आणि रुक्मिणी मातेला विविध पोशाखात नटविण्यात येत होते. मात्र आज दसऱ्याला अत्यंत आकर्षक पद्धतीने सजविलेले देवाचे हे रूप पाहण्यासाठी हजारो भाविकांनी विठ्ठल मंदिरात गर्दी केली. आजच्या साडेतीन मुहूर्तावर विठुरायाच्या दर्शनाने पुढील संपूर्ण वर्ष भरभराटीचे आणि सुख शांतीचे जाते अशी भाविकांची भावना असते.
Published at : 24 Oct 2023 11:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
रायगड
नागपूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion