एक्स्प्लोर
सांगोला तालुक्यात चक्क चार फूट लांब बाजरीच्या कणसाची चर्चा; गावठी बियाण्याची कमाल!
आजवर आपण बाजरीचे साधारण फूटभर लांब कणीस पाहिले असेल; मात्र सांगोला तालुक्यातील कोळा येथील शेतकऱ्याने पेरलेल्या बाजरीला तब्बल चार फूट लांबीचे कणीस लागले आहे.

Sangola Millet Maize
1/9

शेतकरी वर्ग पारंपरिक पिकाकडे पाठ फिरवून नगदी पिकांकडे वळला असताना, आता पारंपरिक पिकांतही नवनवीन प्रयोग होऊ लागले आहेत.
2/9

कोळा येथील शेतकरी राहुल वाले यांनी लावलेल्या बाजरीला तीन ते चार फुटांपर्यंत कणीस लागल्याने ते पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.
3/9

वाले यांनी राजस्थानहून पोस्टाने एक हजार रुपये किलो दराने गावठी बियाणे आणून त्यांची आपल्या शेतात पेरणी केली होती.
4/9

यंदा पर्जन्यमान चांगले झाल्याने पीक चांगले जोमात आले. बहरलेल्या बाजरीला तब्बल तीन ते चार फुटांपर्यंत कणीस लागल्याने पाहणारे परिसरातील शेतकरी गर्दी करू लागले आहेत
5/9

राहुल वाले यांनी 20 गुंठ्यात ही बाजरीचे पीक घेतलअसून, त्यातून उत्पन्न देखील चांगले निघणार आहे.
6/9

नियमित करण्यात येणाऱ्या बाजरी पिकापेक्षा तिपटीने जास्त उत्पादन हे तुर्की जातीचे बाजरी पीक देते, असा दावाही वाले यांनी केला आहे.
7/9

बाजरी बियाण्यांची जात तुर्की असून, कणसाची लांबी चार ते पाच फूट आहे. 20 गुंठ्यात अर्धा किलो बियाणे लागले आहेत. विशेष म्हणजे, यासाठी मोजकीच खते वापरली आहेत.
8/9

आपल्या भागातील बाजरी व तुर्की जात असलेल्या बाजरीमध्ये फरक असल्याचा दावा वाले यांनी केला आहे.
9/9

तुर्की जात असलेल्या बाजरीमध्ये उष्णता कमी प्रमाणात असल्यामुळे ही बाजरी मूळव्याध व शुगर असलेले नागरिकना फायदेशीर ठरू शकेल असा दावा वाले करतात.
Published at : 27 Nov 2023 02:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
नाशिक
व्यापार-उद्योग
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion