एक्स्प्लोर
Bhagirath Bhalke BRS Entry : भगिरथ भालकेंचा बीआरएसमध्ये प्रवेश, केसीआर यांच्या उपस्थितीत प्रवेश
KCR Pandharpur Visit : डोक्यावर फेटा, खांद्यावर उपरणं, गळ्यात तुळशीचा हार; KCR यांचं जंगी स्वागत
Bhagirath Bhalke BRS Entry
1/11

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आज पंढपुरात जाऊन विठुरायाचं देखील दर्शन घेतलं आहे.
2/11

त्यांच्यासोबत काही सहकाऱ्यांनी देखील विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलं. तर मंत्र्यांसह आमदार, खासदारांना मात्र बाहेरुनच नामेदव पायरीचे दर्शन घ्यावं लागलं.
3/11

दरम्यान मंगळवेढा मतदारसंघाचे दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएसमध्ये प्रवेश केला.
4/11

यावेळी भगीरथ भालके यांनी के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणात केलेल्या कार्याचे कौतुक केलं.
5/11

पवार,फडणवीस ते ठाकरे, पंढरपुरात KCR यांचं घणाघाती भाषण आज पाहायला मिळालं
6/11

मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि त्यांच्याबरोबर आलेल्या 25 मंत्र्यांना आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मंदिरात परवानगी देण्यात आली आहे. परंतु केसीआर यांच्याबरोबर आलेल्या पदाधिकाऱ्यांना मात्र रांगेतूनच आई तुळजाभवानीचे दर्शन घ्यावे लागणार आहे.
7/11

दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी आई तुळजाभवानीचे प्रवेशद्वार सामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. पण मुख्यमंत्री केसीआर यांच्याबरोबर किती जणांना मंदिरात प्रेवश द्यायचा हे निश्चित नव्हते.
8/11

पण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि मंदिर प्रशासनाने मंदिर परिस्थितीचा आढावा घेऊन मुंख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यासह पंचवीस जणांना प्रवेश देण्याचे निश्चित केले.
9/11

तुळजाभवानीच्या मंदिर प्रशासानाकडून देखील पूजेची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे तुळजाभवानीची विधीवत पूजा करणार असल्याने खण नारळाची ओटी प्रसाद आणि खास तुळजाभवानीसाठी आणलेली साडी घेऊन पुजारी सज्ज झाले आहेत.
10/11

महाराष्ट्रात भारत राष्ट्र समिती या पक्षाचा मोठा विस्तार करण्याची तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर यांची योजना आहे.
11/11

. त्यासाठी त्यांच्या दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली आहे. आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी सुरू झालेल्या केसीआर यांच्या या दौऱ्याला मोठं महत्व प्राप्त झालंय.
Published at : 27 Jun 2023 05:39 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
























