एक्स्प्लोर
PHOTO : तळकोकणात रणरणत्या उन्हात आशा सेविकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
रणरणत्या उन्हात आशासेविकांनी विविध मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
Sindhudurg Asha Workers March
1/8

रणरणत्या उन्हात आशासेविकांनी विविध मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
2/8

आरोग्य यंत्रणेचे चाक असलेल्या आशांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा.
3/8

तसेच कामाच्या मोबदल्यात देण्यात येणारे मानधन नियमित देण्यात यावे
4/8

या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सीटू संलग्नित आशा वर्कर्स रणरणत्या उन्हात रस्त्यावर उतरल्या.
5/8

ओरोस येथील प्राथमिक शिक्षक पतपेढी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत घोषणा देत मोर्चा काढण्यात आला.
6/8

शिस्तबद्ध पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले.
7/8

तळकोकणात तापमानाचा पारा चढाच असून उकाडा कायम आहे.
8/8

त्यातच अंगाची लाहीलाही होत असताना या आशा सेविका आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्या
Published at : 31 May 2023 01:27 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
नाशिक























