एक्स्प्लोर
PHOTO : कवडीवर शिवराज्याभिषेकाचे एक सेंटीमीटर चित्र
Shiv Rajyabhisek Sohla on Cowry
1/8

रयतेचे स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आजच्या दिवशी रायगड किल्ल्यावर 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक सोहळा झाला होता. छत्रपती असे बिरुद धारण करुन साम्राज्याचे ते अधिपती झाले.
2/8

याच राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड मधील युवा चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी कवड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक ची कलाकृती साकारली आहे.
3/8

देवगड गवाणेमधील युवा चित्रकार अक्षय मेस्त्री याची छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक दिनानिमित्त अनोखी मानवंदना दिली आहे.
4/8

राज्यभिषेक दिनाचे निमित्त साधून अक्षय मेस्त्रीने चक्क कवड्यावर राज्यभिषेक कलाकृती साकारली आहे.
5/8

यासाठी त्याने एक महिना सतत सराव केला. आता त्याला कवड्यावर चित्र साकारायला त्याला पाच मिनिटांचा कालावधी लागला.
6/8

या कलाकृतीसाठी त्याने ॲक्रेलिक रंगांचा वापर केला आहे.
7/8

एक सेंटीमीटर हे सूक्ष्म चित्र साकारायला त्याने भिंगाचा वापर केला आहे.
8/8

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या गळ्यात कवडी माळ आहे. त्याच उदेशाने त्याने कवडीवर चित्र काढले आहे.
Published at : 06 Jun 2022 10:29 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















