एक्स्प्लोर
Sikandar Shaikh : जो जीता वही 'सिकंदर'! सांगलीच्या मैदानात सिकंदरची एका मिनिटात बाजी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सांगलीत कृष्णा काठावर पार पडलेल्या कुस्ती मैदानामध्ये महान भारत केसरी सिकंदर शेखने अवघ्या एक मिनिटात मैदान मारताना गोपी पंजाबला अस्मान दाखवले.

Sikandar Shaikh
1/10

सांगलीत कृष्णा काठावर पार पडलेल्या कुस्ती मैदानामध्ये महान भारत केसरी सिकंदर शेखने (Sikandar Shaikh) अवघ्या एक मिनिटात मैदान मारताना गोपी पंजाबला अस्मान दाखवले.
2/10

रोमहर्षक अशा झालेल्या कुस्तीमध्ये पैलवान सिकंदर शेखने पंजाबाच्या भारत केसरी गोपी पंजाबला चितपट केले.
3/10

पैलवान सिकंदर शेख विरुद्ध पंजाबचा पैलवान गुरुप्रीत सिंग उर्फ गोपी पंजाब यांच्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती पार पडली.
4/10

बाजीगर पैलवान सिकंदर शेख सांगलीचं मैदान मारणार का? याचे उत्तर अवघ्या एका मिनिटात दिले.
5/10

पहिल्यांदाच पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या गोपी पंजाबला एकचाक डावावर हरवत सिकंदरने कुस्ती शौकिनांची शाबासकी मिळवली.
6/10

अडीच लाख रुपये रोख आणि छत्रपती शिवाजी महाराज चषक कोण जिंकणार याची उत्सुकता असलेल्या कुस्ती शौकिनांनी या कुस्तीसाठी तुफान गर्दी केली होती.
7/10

काही सेकंदांमध्ये खडाजंगी होते ना होते तोवर अवघ्या मिनिटांमध्ये सिकंदर मैदान मारले. हनुमंत जाधव यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली.
8/10

सांगलीने नेहमीच जात-पात न पाहता खेळाडूंना प्रोत्साहन दिलं आहे आणि मला देखील नेहमीच सांगलीकरांनी जास्त प्रेम दिले अशा भावना यावेळी सिकंदरने व्यक्त केल्या
9/10

ट्रबल शुटींग सोशल वेलफेअर फौंडेशन व कुस्ती प्रेमी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील कृष्णा घाटावरील आयर्विन पुलाशेजारी भव्य कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं.
10/10

त्यामध्ये छोट्या-मोठ्या अशा 100 कुस्त्या पार पडल्या.
Published at : 27 Feb 2023 01:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
