एक्स्प्लोर
सांगलीत भीषण अपघात, ट्रकची एसटी बसला जोरदार धडक; एसटीचा चक्काचूर, एक ठार, तर 23 जखमी
गुहागर-विजयपूर महामार्गावरील जत तालुक्यातील मुचंडी येथे ट्रकनं एसटी बसला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात एक प्रवासी ठार झाला, तर 23 प्रवासी जखमी झाले आहेत.

Sangli News | Accident on Guhagar Vijaypur Highway
1/10

गुहागर-विजयपूर महामार्गावरील जत तालुक्यातील मुचंडी येथे काल (मंगळवारी) रात्री कर्नाटक सीमेलगत एसटीला ट्रकनं पाठीमागून जोरदार धडक दिली.
2/10

या भीषण अपघातात बसचा मागील बाजूचा चक्काचूर झाला तर एकाचा मृत्यू झाला आहे, तर एसटीमधील जवळपास 23 प्रवासी जखमी झाले आहेत.
3/10

या अपघातातील 12 जण गंभीर जखमी असून हा अपघात मंगळवारी साडेसातच्या सुमारास झाला.
4/10

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आगाराची सांगोला-विजयपूर बस ही विजयपूरला निघाली होती, तर साईराज ट्रान्सपोर्टचा ट्रक हा साखर भरून विजयपूरला निघाला होता.
5/10

सांगोला- विजयपूर बस कर्नाटक "सीमेलगतच्या बसथांब्यावर प्रवासी उतरत होते. याठिकाणी तीव्र उतार आहे.
6/10

पाठीमागून भरधाव वेगानं आलेल्या ट्रकवरील चालकाचं नियंत्रण सुटलं. चालकाचा ताबा न राहिल्यानं ट्रकनं पाठीमागून एसटीला जोराची धडक दिली.
7/10

ट्रकची धडक इतकी जोराची होती की, एसटीत असणारे 23 प्रवाशी जखमी झाले आहेत. तर एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.
8/10

23 जखमी प्रवाशांपैकी 13 जण गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी जत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे,
9/10

सर्व जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
10/10

अपघाताबाबत पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे.
Published at : 07 Jun 2023 07:58 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
भारत
भारत
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
