एक्स्प्लोर
Sangli News : ग्रेप सिटी वाइनरी सहकारी संस्थेतून 7 प्रकारच्या वाईन; अडचणीमधील द्राक्ष शेतकऱ्यांना मोलाचा आधार
Sangli News : व्यापारी न नेणारी द्राक्षे योग्य दरात ही ग्रेप सिटी वाइनरी घेते आणि यापासून वाईन बनवते. या वाईनरीमध्ये द्राक्षपासून जवळपास 7 प्रकारच्या वाईन बनवल्या जात आहेत.

sangli
1/10

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील सावळजमध्ये ग्रेप सिटी वाइनरी सहकारी संस्था वाईन फॅक्टरी सुरू झाली आहे.
2/10

या फॅक्टरीमधून अवकाळी पावसाच्या तडाख्यातून किंवा निर्यात न होणाऱ्या द्राक्षांमधून 7 प्रकारच्या वाईन बनवता येतात.
3/10

त्यामुळे नेहमी अस्मानी संकटाशी लढणाऱ्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना (grape farmers) हा एक फार मोठा आधार आहे.
4/10

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर अवकाळीचे संकट (unseasonal rain) पाचवीला पुजले आहे. अशा अवकाळी संकटात द्राक्ष बागा सापडल्या, तर या द्राक्षबागांकडे द्राक्ष व्यापारी पाठ फिरवतात.
5/10

मग नाईलाजास्तव ही द्राक्ष फेकून द्यावी लागतात आणि शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते.
6/10

हेच संकट ओळखून द्राक्ष शेतीचे हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तासगाव तालुक्यातील सावळजमध्ये ग्रेप सिटी वाइनरी सहकारी संस्था उभारली गेली आहे.
7/10

ती संस्था अडचणीत सापडलेल्या द्राक्ष शेतकऱ्यांना आधार ठरत आहे. आज फेकून देण्यापेक्षा द्राक्ष माल जात आहे आणि त्यातून थोडेफार का होइना पैसे देखील मिळत आहेत याचे शेतकऱ्यांना जास्त समाधान वाटते.
8/10

ग्रेप सिटी वाइनरी पावसाच्या तडाख्यात सापडलेल्या आणि व्यापारी द्राक्षं काही कारणांमुळे न नेणाऱ्या तासगाव तालुक्यासह कवठेमहांकाळ, जत, खानापूर, आटपाडी तालुक्यातील द्राक्ष शेतकऱ्यांसाठी आधार आहे. e 8
9/10

आज या वाईनरीमध्ये द्राक्षपासून जवळपास 7 प्रकारच्या वाईन बनवल्या जात आहेत. द्राक्षबरोबरच, जांभूळ, करवंद, मँगो, मध यापासून देखील या ग्रेप सिटी वाइनरीमध्ये वाइन बनवली जाते.
10/10

तसेच डाळींबपासून वाइन बनवण्याचा प्रयोग करण्यात आला असून तो यशस्वी झाला आहे. त्यामुळे लवकरच डाळिंबपासून देखील वाइन बनवणे सुरु करण्यात येणार आहे.
Published at : 19 Apr 2023 05:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
मुंबई
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion