एक्स्प्लोर
rare snake : बाप रे बाप... घरामध्येच आढळला दुर्मिळ फोर्स्टेन मांजऱ्या साप! पाहा फोटो
Rare Forsten cat snake : हा साप घराच्या छताच्या पत्र्याखाली लोखंडी पाईपवर बसला होता.

rare snake : बाप रे बाप... घरामध्येच आढळला दुर्मिळ फोर्स्टेन मांजऱ्या साप! पाहा फोटो
1/10

रायगडच्या सुधागड तालुक्यातील खुरावले येथील मुकुंद जाधव यांच्या घरामध्ये दुर्मिळ प्रजातीचा साप आढळला.
2/10

हा दुर्मिळ साप साधारणपणे साडेचार फूट लांबीचा होता.
3/10

या दुर्मिळ सापाचे नाव फोर्स्टेन मांजऱ्या साप (Forsten cat snake) असे आहे.
4/10

हा साप घराच्या छताच्या पत्र्याखाली लोखंडी पाईपवर बसला होता.
5/10

या सापाला येथील सर्पमित्र संदीप जाधव यांनी मोठ्या शिताफीने पकडले.
6/10

सापाला पकडण्यात आल्यानंतर वनविभागाच्या मदतीने सुखरूप अधिवासात सोडून दिले.
7/10

या सापाच्या अंगावर मांजराच्या त्वचे सारखा रंग आणि चट्टे असल्याने हा मांजऱ्या साप किंवा कॅट स्नेक म्हणून ओळखला जातो.
8/10

फॉस्टेन कॅट स्नेक हा सहज आढळणारा साप नसून हा झाडाच्या छिद्रात, घरट्यात, ढोलीत विशेषतः आढळतो.
9/10

याचे खाद्य पाल, सरडे, बेडूक इत्यादी प्रकारचे आहे.
10/10

मांजऱ्या प्रजाती सापामध्ये कॉमन कॅट स्नेक (साधा मांजऱ्या साप) सर्वत्र आढळतो पण फॉस्टेन कॅट काही विशिष्ट भागातच आढळतो.
Published at : 02 Oct 2023 11:32 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
बीड
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
