एक्स्प्लोर
Photo : पुण्यात अजितदादांच्या हस्ते कार्यालय उद्घाटनाच्या कार्यक्रमाला तोबा गर्दी, कोरोना नियमांची पायमल्ली
ajit pawar news
1/8

राज्यात कोरोनाची साथ आल्यापासून नियमांचं पालन करण्यात सर्वात दक्ष म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवारांकडं पाहिलं जातं.
2/8

अगदी पत्रकार परिषदांच्या आधी ते सॅनिटायझर बुमवर फिरवायचे. अजित पवारांना कधीही या काळात विनामास्क पाहिलं गेलं नाही.
3/8

मात्र आज त्यांच्याच उपस्थितीमध्ये पुण्यातील एका कार्यक्रमात कोरोनाच्या नियमांना हरताळ फासला गेला.
4/8

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयाचं उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते झालं.
5/8

या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी तोबा गर्दी केली. कोरोना नियमांची पायमल्ली झाल्याचं चित्रं पाहायला मिळालं.
6/8

अजितदादा नेहमी गर्दी टाळण्याचे आवाहन करत असताना राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला मात्र तुफान गर्दी पाहायला मिळाली.
7/8

आजच अजित पवार यांनी निर्बंध शिथील झाल्यानंतर जिल्ह्याबाहेर फिरायला जाणाऱ्यांना इशारा दिला आहे.
8/8

फिरण्यासाठी जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना जिल्ह्यात परतल्यानंतर 15 दिवस क्वॉरन्टीन करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे, असं अजित पवार म्हणाले.
Published at : 19 Jun 2021 06:49 PM (IST)
आणखी पाहा























