एक्स्प्लोर
Pune Bandh : पुणे बंदमुळे लक्ष्मी रोड बंद, बाजारात शुकशुकाट!
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी (Bhagat Singh Koshyari ) छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत (Chatrapati Shivaji Maharaj) आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे आज पुणे बंदची हाक दिली आहे.
pune band
1/8

आज पुणे बंदची (Pune Bandh) हाक दिली आहे. यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सुमारे साडेसात हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे.
2/8

सामाजिक संघटना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी पुकारलेल्या पुणे बंदचा परिणाम आज दिसून येत आहे.
3/8

त्या सोबतच पुण्यातील व्यापारी संघटना आणि गणेशोत्सव मंडळांनीदेखील पाठिंबा दिला आहे.
4/8

पुणे बंदचा परिणाम आज पुण्यातल्या गजबजलेल्या ठिकाणी दिसून येतोय.
5/8

आपण पाहत असलेले फोटो हे पुण्याची गजबजलेली बाजारपेठ म्हणजेच लक्ष्मी रोडचे आहेत.
6/8

सध्या लग्नसराईचा सीजन सुरु असल्याने लक्ष्मी रोड दिवसभर गजबजलेला असतो.
7/8

पण इथल्या व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेऊन पुणे बंदला पाठींबा दिल्याचं दिसून येत आहे.
8/8

राज्यपालांविरोधात असलेल्या या बंदला पुणेकरांचा चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे.
Published at : 13 Dec 2022 11:03 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























