एक्स्प्लोर
Narayan Rane vs Prakash Mahajan: उंची, लवंगे, विलायचीपासून उलट्यापर्यंत... नारायण राणे अन् प्रकाश महाजन यांच्यात नेमका वाद काय?
Narayan Rane vs Prakash Mahajan: मनसे नेते प्रकाश महाजन यांनी खासदार नारायण राणेंविरोधात दंड थोपटले आहेत.
Narayan Rane-Prakash Mahajan
1/7

Narayan Rane vs Prakash Mahajan: भाजपचे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर टोला लगावला होता. यावरुन मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी राणेंना प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर पुन्हा भाजपचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी प्रकाश महाजनांवर हल्लाबोल केला. नारायण राणेंच्या या टीकेवरुन आता मनसेही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
2/7

नारायण राणे यांनी मला धमकी दिली असल्याचा आरोप करत प्रकाश महाजन यांनी आज छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात आंदोलन करण्याचा निर्धार केला. मात्र त्यांच्या आंदोलनापूर्वीच महाजन यांच्या घरी पोलीस दाखल झाले होते. पोलिसांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र प्रकाश महाजन आंदोलनावर ठाम राहिले.
3/7

माध्यमांशी बोलताना प्रकाश महाजन म्हणाले की, मी इथे त्यांची अर्धा तास वाट पाहणार आहे. मला पोलिसांनी अर्ध्या तासाची परवानगी दिली आहे. मी घराचा पत्ता सांगितलेला आहे. त्यांनी त्या घरापाशी यावे आणि त्यांना काय मारहाण करायची ती करावी. मी त्याच्या देखील पुढे जाऊन सांगतो की, मला ज्या पद्धतीची धमकी देण्यात आली होती. मी सुद्धा जीवावर उदार झालो आहे. नारायण राणे साहेब तुम्ही चुकीच्या बिळात हात घालत आहात. मी प्रकाश महाजन आहे, असे खुले आव्हान त्यांनी नारायण राणे यांना दिले.
4/7

'राज-उद्धव एकत्र येणार असल्यानं झोप उडाली,एकाचे २० आणि एकाचे ० आमदार' असे नितेश राणेंचं वक्तव्य
5/7

नितेश राणेंची वैचारिक उंची उभं राहिल्यावर लवंगेएवढी बसल्यावर विलायचीएवढी असं प्रकाश महाजनांचं वक्तव्य
6/7

नारायण राणे महाजनांवर संतापले, लायकीत राहा,जास्त बोलाल तर उलट्या करायला लावेन अशी धमकी
7/7

माझे बरे-वाईट झाले तर नारायण राणे जबाबदार असे महाजनांचे प्रत्युत्तर, कणकवलीत जाऊन आंदोलन आंदोलन करेन
Published at : 10 Jun 2025 02:36 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
























