एक्स्प्लोर
Dhananjay Munde Resign: मी राजीनामा कशाला देऊ?, देवगिरी बंगल्यावरच्या बैठकीत धनंजय मुंडेंचा सर्वांदेखत सवाल, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Dhananjay Munde Resign: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
Dhananjay Munde
1/10

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी (Dhananjay Munde) आज (4 मार्च) आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
2/10

धनंजय मुंडेंनी आपल्या सहाय्याकांमार्फत आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे सुपूर्द केला.
3/10

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा राजीनामा स्वीकारला असून तो पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे हे मंत्रिपदावरुन पायउतार झाले आहेत.
4/10

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही फोटो काल समोर आल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. यानंतर राजकीय हालचालींना देखील वेग आला होता.
5/10

काल रात्री उशीरा (3 मार्च) देवगिरी बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांना धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले.
6/10

धनंजय मुंडे राजीनामा देण्यास तयार नव्हते. म्हणजे ते याप्रकरणात आपला सहभाग नव्हता, हे सांगत होते. या सगळ्या घटनेत आपला कुठेही काहीही संबंध नाही. मग मी राजीनामा का द्यावा? असा प्रश्न धनंजय मुंडे यांच्याकडून उपस्थित करण्यात आला.
7/10

मात्र, वाल्मिक कराडशी असलेल्या जवळीक, यामुळे धागेदोरे त्यांच्यापर्यंत पोहोचले, त्यामुळे नैतिकतेचा प्रश्न येतो. संवैधानिक पदावरील व्यक्तीने या गोष्टीचा विचार करायला हवा, ही देवेंद्र फडणवीसांची भूमिका होती.
8/10

देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणांचं गांभीर्य सांगितलं. सरकारच्या भविष्यात वाढणाऱ्या अडचणी देखील देवेंद्र फडणवीसांनी बैठकीत सांगितल्या.
9/10

संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराडचे नाव आल्यापासून धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी होत होती.
10/10

धनंजय मुंडे यांचा या प्रकरणात थेट सहभाग नाही, असे सांगत अजित पवार यांनी त्यांची पाठराखण केली होती. मात्र आज अखेर धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
Published at : 04 Mar 2025 02:59 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























