एक्स्प्लोर
Palghar News: वेरोली नदीमध्ये शेकडो मृत माशांचा खच; केमिकलयुक्त सांडपाण्याने बळी घेतला?
Palghar News: रात्रीच्या सुमारास अनोळखी व्यक्तींनी या नदीत कंपन्यांमधून निघणार केमिकल युक्त रासायनिक सांडपाणी टँकरच्या सहाय्याने या नदीत सोडलं असल्याने हा प्रकार घडल्याचं उघडकीस आले आहे.
Palghar News: वेरोली नदीमध्ये शेकडो मृत माशांचा खच; केमिकलयुक्त सांडपाण्याने बळी घेतला?
1/10

पालघर जिल्ह्यामधील तलासरी तालुक्यातील वेरोली या नदीत मृत माशांचा खच आढळून आला.
2/10

रात्रीच्या सुमारास अनोळखी व्यक्तींनी या नदीत कंपन्यांमधून निघणारे केमिकलयुक्त रासायनिक सांडपाणी टँकरच्या सहाय्याने या नदीत सोडले असल्याचा आरोप होत आहे.
3/10

या केमिकलयुक्त सांडपाण्याने हा प्रकार घडला असल्याचे आलं आहे.
4/10

या प्रकारामुळे शेकडो मृत अवस्थेत मासे नदीच्या तीरावर आले आहेत
5/10

वेरोली नदी ही तलासरीतील झरी, गिरगाव, वडवली, वंकास, सवणे, धामणगाव या गावातून वाहत पुढे समुद्राला मिळते.
6/10

वेरोली नदीतील पाणी या गावांमधील शेतकरी शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात.
7/10

आता या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
8/10

नदीतील प्रदूषणाचा दुष्परिणाम शेतीवर आणि स्थानिकांच्या आरोग्यावर होऊ नये अशी अपेक्षा केली जात आहे.
9/10

तसंच या प्रकरणात योग्य तपास करून कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरीकांकडून केली जात आहे.
10/10

नदीतील प्रदूषणामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आता प्रशासन कोणती कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.
Published at : 14 Jan 2023 05:24 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्रीडा
व्यापार-उद्योग
























