एक्स्प्लोर
Ajit Pawar Nashik : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नाशिक शहरात ग्रँड एंट्री, कार्यकर्त्यांची तोबा गर्दी, पाहा फोटो
Ajit Pawar : नाशिक जिल्ह्याचे सारथ्य हे पुढील काळात पुन्हा एकदा भुजबळांकडेच राहील, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती.
Ajit Dada Sameer Bhujbal
1/10

'शासन आपल्या दारी ' या योजनेच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहनाचे सारथ्य आज माजी खासदार समीर भुजबळ हे करताना दिसून आले.
2/10

या वाहनात मंत्री छगन भुजबळ, आ. माणिकराव कोकाटे, आ.दिलीप बनकर हे मागील सीटवर तर अजितदादा हे पुढील सीटवर बसलेले होते...
3/10

नाशिक जिल्ह्याचे सारथ्य हे पुढील काळात पुन्हा एकदा भुजबळांकडेच राहील अशी चर्चा या निमित्ताने शासकीय विश्रागृहावरून गाड्यांचा ताफा निघाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती.
4/10

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज नाशिक रोड रेल्वे स्थानकात आगमन होताच पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने ढोलताशा वाजवत, फटाक्यांची आतषबाजी व पुष्पवृष्टी करत नाशिक शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.
5/10

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आज शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी नाशिक दौऱ्यावर आहे. सकाळी ९ वाजेच्या वंदे भारत एक्सप्रेसने नाशिकरोड रेल्वे स्थानकात त्यांचे आगमन झाले.
6/10

नाशिकरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.
7/10

नाशिकरोड येथून मोटारसायकल रॅली काढत नाशिक रोड ये शासकीय विश्रामगृहापर्यंत त्यांचे शहरात ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी माजी खासदार समीर भुजबळ यांनी त्यांच्या गाडीचे सारथ्य केले.
8/10

नाशिक शहरात त्यांचे नाशिक रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, दत्त मंदिर, उपनगर, द्वारका, मुंबईनाका चौकासह ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करत फुलांची उधळण करत जल्लोषात स्वागत करण्यात आले.
9/10

जेसीबीमधून पुष्पवृष्टी करत क्रेनच्या सहायाने हार घालण्यात आला. यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांची व नाशिककरांची अभूतपूर्व गर्दी बघावयास मिळाली.
10/10

नाशिक जिल्ह्याचे सारथ्य हे पुढील काळात पुन्हा एकदा भुजबळांकडेच राहील, अशी चर्चा या निमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती.
Published at : 15 Jul 2023 01:39 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
नागपूर
महाराष्ट्र























