एक्स्प्लोर
नाशिकच्या पुराची भयंकर प्रचिती, गोदाघाटावर भलेमोठे दगड आले वाहून, पाहा PHOTOS
Nashik Godavari Flood : नाशिकमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. यामुळे गंगापूर धरणातून यंदाचा पहिला विसर्ग करण्यात आला. आता पूर ओसरल्यानंतर पुराची भयंकर प्रचिती समोर आली आहे.

Godavari Flood 2024
1/9

नाशिकच्या गोदावरी नदीची पूरस्थिती कमी झाली आहे. गोदेचा पूर ओसरला आहे. हा पूर किती भयंकर होता, पाण्याचा प्रवाह किती जोरात होता याची प्रचिती पूर ओसरल्यानंतर येत आहे.
2/9

गोदा पात्रात आणि काठावर मोठं मोठे दगड वाहून आले आहेत.
3/9

होळकर पुलाखाली मेकॅनिकल गेटचे काम सुरू आहे. होळकर पुलाखालून 11 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु होता. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहासोबत मोठमोठे दगड वाहून आले आहेत.
4/9

घनकचरा व्यवस्थापनाकडून आता गोदावरी नदीमध्ये वाहून आलेला कचरा हटविण्याचे काम सुरु आहे.
5/9

स्मार्ट सिटीच्या गोदा घाट सुशोभीकरणाच्या कामाचेही प्रचंड नुकसान झाले आहे.
6/9

नदीपात्रात महापालिकेकडून स्वच्छता केली जात आहे.
7/9

पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या पानवेली बाहेर काढल्या जात आहेत.
8/9

गोदावरी नदीचा पूर पूर्णतः ओसरल्यानंतर नेमकं किती दगड वाहून आलेत? हे स्पष्ट होणार आहे.
9/9

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग आता कमी करण्यात आला आहे.
Published at : 06 Aug 2024 11:29 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
बातम्या
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
