Omraje Nimbalkar: एवढा उन्माद येतो कुठून? तुळजापुरातही बीड प्रमाणे 'आका' संस्कृती आणायचीय का? गोळीबार प्रकरणानंतर ओमराजे निंबाळकरांचा संतप्त सवाल
तुळजापूर गोळीबार प्रकरणानंतर खासदार ओमराजे निंबाळकर आक्रमक झालेत.सरपंच संतोष देशमुखयांच्या हत्येप्रमाणेच हत्या करायची होती का? एवढा उन्माद कुठून येतोय?सवाल करत घणाघात केलाय.

धाराशिव : बीडप्रमाणे (Beed Crime) तुळजापुरात (Tuljapur) आका संस्कृती आणायचे आहे का?, सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रमाणेच हत्या करायची होती का? एवढा उन्माद कुठून येतोय? असा सवाल करत तुळजापूर गोळीबार प्रकरणानंतर खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje nimbalkar) आक्रमक झालेत. ड्रग्ज प्रकरणातील (Tuljapur Drugs) लोकांकडे गावठी कट्टे पिस्तूल आले कुठून?, याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी ओमराजे निंबाळकर यांनी केलीय. तुळजापुरातील महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार अमर मगर यांच्या घराबाहेर राड्यानंतर ओमराजे आक्रमक झाले असून त्यांनी अनेक सवाल करत घणाघात केलाय. (Omraje Nimbalkar on Tuljapur Drugs Case)
Omraje Nimbalkar: एवढा उन्माद येतोय कुठून? गुन्हेगारांना पोलीस पाठीशी घालत असल्याचाही आरोप
तुळजापुरात महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमर मगर यांचे बंधू ऋषी मगर आणि भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पिटू गंगणे यांच्यामध्ये सुरुवातीला वादावादी झाली. त्यानंतर वाद मिटल्यावर काही वेळाने अमर मगर यांचे बंधू कुलदीप मगर यांच्यावर हल्ला झाला. कुलदीप मगर यांनी दिलेल्या जबाबानुसार पिटू गंगणे यांच्या विरोधात प्रचार का केला, यामुळेच मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला. यात तलवार, कोयते याने हल्ला झाला. तसेच जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार झाल्याचही जबाबात सांगण्यात आलं आहे. यावरून खासदार ओमराजे निंबाळकर आक्रमक झाले असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
Tuljapur Drugs : ड्रग्स मुद्द्यवरूनराजकारण तापलं
तुळजापूरमधील ड्रग्सचा मुद्दा सातत्याने गाजत असून राजकीय वादाचा मुद्दा बनला आहे. त्यातच, यापूर्वी देखील याच मुद्द्यवरूनराजकारण तापलं होतं. यात महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थिती सुरू असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ड्रग्स प्रकरणावरुन चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली होती. यावेळी, खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje nimbalkar) आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याचं दिसून आले. होय, माझ्या बापाने दूध विकलं, दूध विकण काय गुन्हा आहे का, बापाने दूध (milk) विकल्याचा मला अभिमान आहे. दुध विकलंय, ड्रग्स नाही, असे म्हणत खासदार ओमराजे निंबाळकर आमदार राणा पाटलांवर संतापल्याचे दिसून आले. अशातच आता पुन्हा जिल्यातील गुन्हेगारी आणि ड्रग्स प्रकरणावरून सरपंच देशमुखांच्या हत्याप्रमाणेच तुळजापुरात हत्या करायची होती का? असा सवाल करत गोळीबार प्रकरणानंतर ओमराजे निंबाळकरांनी निशाण साधला आहे.
आणखी वाचा























