एक्स्प्लोर
Nanded Rain Update : नांदेड जिल्ह्यात पावसाची हजेरी, शेतकऱ्यांना दिलासा; पाहा फोटो
Nanded Rainfall Update : ऑगस्ट महिना सुरु झाल्यापासून नांदेड (Nanded) जिल्ह्यात पावसाने (Rain) दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडले होते.

Nanded Rainfall Update
1/10

नांदेड जिल्ह्यात शुक्रवारपासून सुरु झालेला पाऊस शनिवारी देखील काही ठिकाणी पाहायला मिळाला.
2/10

ज्यात, किनवट तालुक्यामध्ये अतिवृष्ट झाली असून, परिसरात अनेक नदी-नाल्यांना पूर आला.
3/10

त्यामुळे या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे. तर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
4/10

जून महिना कोरडा गेल्यावर जुलै महिन्यात काही प्रमाणात पाऊस पडला. नांदेड जिल्ह्यात जुलै महिन्यात अनेक ठिकाणीअतिवृष्टी झाली. त्यामुळे पेरणी देखील जोरात झाली.
5/10

मात्र, पुढे पावसाने दडी मारल्याने पिकं धोक्यात आली. जुलै महिन्याचे शेवटचा आठवडा आणि ऑगस्ट महिना आतापर्यंत पूर्णपणे कोरडा गेला होता.
6/10

मात्र, आता पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवनदान मिळाले असून, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
7/10

नांदेड जिल्ह्यात 24 तासांमध्ये सरासरी 32 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
8/10

नांदेड किनवट तालुक्यामध्ये एकूण सहा मंडळ आहेत. या सहाही मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.
9/10

बोधडी मंडळात सर्वाधिक 101.30 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
10/10

किनवट मंडळात 81.30, सिंदगी मंडळात 69.80, इस्लापूर 66.80, शिवणी 65.80 आणि जलधारा मंडळामध्ये 65.30 मिमी पाऊस झाला आहे.
Published at : 20 Aug 2023 10:53 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion